शेतकर्‍यांचे तीन हजार कोटी कधी देणार ? आमदार रोहित पवार | पुढारी

शेतकर्‍यांचे तीन हजार कोटी कधी देणार ? आमदार रोहित पवार

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्चअखेर 3 हजार कोटी रुपये शेतकर्‍यांना देण्याची घोषणा केली होती. मात्र, एप्रिल महिना निम्मा सरला तरी शेतकर्‍यांना मिळाले नाहीत. त्यामुळे राज्य सरकार शेतकर्‍यांचे पैसे केव्हा देणार? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

आमदार पवार म्हणाले, राज्यातील डबल इंजिनचे सरकार हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणाबाजी करीत आहे. मात्र, या इंजिनचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी व विकास कामांसाठी अजिबात होणार नाही, अशी टीका त्यांनी केली. आमदार पवार म्हणाले, नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 750 कोटी रुपये व कर्जत-जमखेड मतदारसंघातील शेतकर्‍यांना 62 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे मागणी करण्यात आली होती .ती सरकारने मंजूर केली. मात्र, अद्यापि शेतकर्‍यांना मदत मिळाली नाही.

मागील नुकसानीची मदत शेतकर्‍यांना मिळाले नाही. आताही सर्वत्र अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकर्‍यांच्या. फळबागां आणि पिकांचे मोठेा नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. सरकार शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका त्यांनी केली.
कांद्याचे भावामुळे नुकसान झाले. त्यावेळी आम्ही शेतकर्‍यांना पाचशे रुपये प्रतिटन अनुदान देण्याची मागणी केली.सांगितले. आंदोलन केल्यावर 350 रुपये क्विंटलप्रमाणे अनुदान मंजूर केले. मात्र, त्यासाठी जाचक अटी घातल्या आहेत. परिणामी राज्य सरकारवर शेतकरी नाराज असल्याचे आमदार पवार यावेळी म्हणाले.

Back to top button