नगर : देडगाव, भानसहिवरा, प्रवरासंगम नवे सर्कल ; तालुक्यात महसूल मंडळाची संख्या 11

नगर : देडगाव, भानसहिवरा, प्रवरासंगम नवे सर्कल ; तालुक्यात महसूल मंडळाची संख्या 11
Published on
Updated on

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : महसूल विभागाकडून सहा तलाठी सजेच्या गावामागे एक मंडळ नवनिर्मित पुनर्रचना तत्त्वानुसार नेवासा तालुक्यात आता देडगाव, भानसहिवरा व प्रवरासंगम या नवीन सर्कलांची निर्मिती केली असून, पहिले आठ तर नवे तीन, असे एकूण 11 महसूल मंडळाची संख्या झाली. तसेच 15 नवीन तलाठी सजेची निर्मिती झाली आहे. या पुनर्रचनेत हिच संख्या नगर जिल्ह्यात 202 वाढीव तलाठी व 34 वाढीव महसूल मंडळ आहेत. नेवासा तालुक्यात नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, सोनई, चांदा, कुकाणा, घोडेगाव, वडाळा बहिरोबा, सलाबतपूर, असे आठ महसूल मंडळाधिकारी कार्यालये होती. आता, देडगाव, भानसहिवरा व प्रवरासंगम या कार्यालयांची भर पडली.

तलाठी सजा व मंडळाधिकारी पुनर्रचना समितीने नव्या 202 तलाठी सजासाठी तलाठी 'स' वर्गाची 202 पदे व मंडळाधिकारी 'स' वर्ग पदाची 34 नवी वाढीव पदे या अनुषंगाने निर्माण करण्यास नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी परवानगी दिली असून, सध्या काही मंडळाधिकारी व तलाठ्यांना नव्या मंडळाधिकारी व तलाठी सजाचा अतिरिक्त कारभार पाहण्याचे आदेशात नमूद केले आहे.
मुकिंदपूर आता भानसहिवरा सर्कलमध्ये मुकिंदपूर सजेचे गाव आता भानसहिवरा सर्कलमध्ये जोडले गेले असून, नेवासा फाटा परिसर मुकिंदपूर हद्दीत येते. अलीकडे या फाट्यावर मोठी बाजारपेठ वाढत चालली असून, नवे भानसहिवरा सर्कल नेवासा फाट्यावरील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी सोयीचे ठरणार आहे.

नवीन तीन मंडळ व गावे
देडगाव सर्कल : देडगावसह तेलकुडगाव, माका, जेऊर हैबती व महालक्ष्मी हिवरा.
भानसहिवरा सर्कल : मुकिंदपूर म्हणजेच नेवासा फाटासह मक्तापूर, सौंदाळा, रांजणगाव, उस्थळ दुमाला
प्रवरासंगम सर्कल : प्रवरासंगमसह बकुपिंपळगाव, गळनिंब, खडका, जळका बुद्रुक, जळका खुर्द

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news