नगरमधील नेवाशातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले | पुढारी

नगरमधील नेवाशातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  नेवासा पोलिसांनी वाळू तस्करीला आळा घालण्याचे प्रयत्न करत असल्याने तालुक्यातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. दुसर्‍या दिवशीही कारवाईचा बडगा सुरूच आहे. नेवासा पोलिसांनी रविवारी (दि.9) शहरातील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामागे वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून कारवाई केली. यानंतर मंगळवारी (दि.11) नेवासा बुद्रूक गावातील माळीवस्ती ते जायगुडे आखाडा जाणार्‍या रस्त्यावर प्रवारानदी पात्रात एक चॉक

लेटी रंगाचा टेम्पो अवैध वाळुची चोरटी वाहतूक करताना पकडला असून, पोलिसांच्या सलगच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. रविवारी नेवासा पोलिसांनी शहरातील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामागे वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला. याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात पोलिस नाईक राहुल यादव यांनी फिर्याद दिली होती. मंगळवारी सकाळी आठ वाजता नेवासा खुर्द गावातील माळीवस्ती येथे प्रवरा नदीपात्रात एक लाल रंगाचा डंपर वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नेवासा पोलिस घटनास्थळी गेले. ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मागे लाल रंगाचा बिना नंबरचा डंपर येताना दिसला. या डंपरमध्ये एक ब्रास वाळूने भरलेली दिसली. यावेळी डंपर चालक अमोल नामदेव धनवटे (रा. लक्ष्मीनगर, नेवासा खुर्द) हा विनापरवाना वाळू वाहतूक करताना आढळला.

यावेळी एक ब्रास वाळू व चार लाखांचा डंपर, असा चार लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर, दुसर्‍या दिवशी मंगळवारी पोलिस राहुल यादव यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले की, सकाळी 6 वाजता नेवासा बुद्रुक गावातील माळीवस्ती ते जायगुडे आखाडा जाणार्‍या रस्त्यावर प्रवरानदी पात्रात एक टेम्पो अवैध रित्या वाळुची चोरटी वाहतूक करताना पकडला. शासकीय मालकीची दोन ब्रास वाळूने भरलेला होता. चालक बाळासाहेब उर्फ प्रकाश खादे (रा. नेवासा बुद्रुक, ता. नेवासा) यांच्याकडून 20 हजाराची दोन ब्रास वाळू व दोन लाखांचा टेम्पो, आशा दोन लाख 20 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्हा दाखल केला आहे.

महसूल खाते झाले सक्रिय
सोमवारी रात्री 11.45 वाजता अनधिकृत गौणखनिज उत्खनन करून वाहतूक करताना नेवासा-देवगड रस्त्यावर महसूल विभागाने विना नंबर टेम्पो पकडून कारवाई केली. चालक महेश अडागळे यांच्या सांगण्यानुसार रिकी शेख यांच्या मालकीचा विनाक्रमांकाचा अनधिकृत वाळू वाहतूक करत असलेल्या टेम्पोवर कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. नायब तहसीलदार किशोर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

Back to top button