जामखेडकरांना प्रतीक्षा भरपाईच्या 22 कोटींची | पुढारी

जामखेडकरांना प्रतीक्षा भरपाईच्या 22 कोटींची

जामखेड : पुढारी वृतसेवा : तालुक्यात ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे 23 हजार 656 शेतकर्‍यांची पिके बाधित झाल्याचे पंचनाम्यानंतर समोर आले होते. त्यानुसार तालुका प्रशासनाने 13 हजार 995 हेक्टरवरील पिकांच्या नुकसानभरपाईपोटी 22 कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे 3 नोव्हेंबर रोजी केली होती. त्याला पाच महिने झाले तरी शेतकर्‍यांच्या खात्यात अजून दमडीही आली नाही. तालुक्याला दोन आमदार असूनही शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याची खंत व्यक्त होत आहे.

तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात अनेक भागांत सतत पाऊस पडला. तसेच अनेक महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिंकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खर्डा परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली होती व तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दिवाळी अखेरपर्यंत पंचनामे झालेही. त्यानंतर बाधित क्षेत्राचे अवलोकन करून 22 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली. मात्र आजपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यावर दमडी आली नसल्याने शेतकर्‍यांमध्ये सरकारबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.

तालुक्यातील नुकसान झालेल्या जिरायती पिकांसाठी 16.31 कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यात जिरायती व बागायती पिकांचे नुकसान सततच्या पावसामुळे झाले आहे. यात प्रामुख्याने सोयबीन, उडीद, मूग पिकांचा समावेश आहे. बागायती आणि हंगामी बागायती पिकांमध्ये एकूण 4129 शेतकर्‍यांचे 2005 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने मका, तूर, मिरची, वांगे, कांदा, टोमॅटो या पिकांचा समावेश आहे. फफ

दोन्ही आमदारांचे दुर्लक्ष?
आमदार राम शिंदे हे सत्ताधारी पक्षाचे असूनही तालुक्यातील 23 हजार शेतकरी नुकसानभरपाईची प्रतीक्षा करत आहेत. आमदार रोहित पवार देखील सतत मतदारसंघातील विविध प्रश्नांचा पाठपुरावा करत असतात. मात्र त्यांचेही या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दोन्ही आमदारांमध्ये श्रेयवादाचे राजकारण असल्याचे शेतकरी उघडपणे बोलत आहेत. मात्र कुणीही श्रेय घ्या, पण नुकसानभरपाई द्या, असेही म्हणत आहेतर्.ेंफ

जिरायती पिकांसाठी 16.31 कोटी, बागायती पिकांसाठी 5.41 कोटी, असे एकूण 22 कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी तालुका प्रशासनाने केली होती. परंतु अजून शासनाकडून अनुदान जमा झाले नाही.
                                                                                   योगेश चंद्रे, तहसीलदार 

Back to top button