नगर शहरातील जुगार अड्ड्यांवर एलसीबीची छापेमारी ; 47 जुगारी पकडले | पुढारी

नगर शहरातील जुगार अड्ड्यांवर एलसीबीची छापेमारी ; 47 जुगारी पकडले

नगर : पुढारी वृत्तसेवा : जंगुभाई तालीम व जुना पिंपळगाव रस्त्यावरील हॉटेल सिटी प्राईड जवळ पत्र्याच्या शेडमध्ये एलसीबीच्या पथकाने छापा टाकून 47 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात नऊ दुचाकी, तीन कार, मोबाईल व रोख असा तेरा लाख 11 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तूषार विलास तोडमल, धनेश किशोर धनवटे (दोघेही रा.वाघगल्ली,नालेगाव), अभिजीत हर्षकांत सासोडकर(रा.विठ्ठल मंदीरामागे, तोफखाना) प्रशांत वसंत देठे (रा.सूर्यानगर सावेडी), अंबादास दत्तात्रय यणगूल (रा.दिल्लीगेट), विलास प्रद्याकर वराळे (रा.सादीकमळा, भिंगार) लक्ष्मण अर्जून सारसर (रा.नालेगाव), गोरक्ष शिवनाथ बडे(रा.भिंगार), निलेश वसंत येनगंधुल, निर्मलदास देवराम कांबळे, पवन दिपक पवार, अंबादास सूदर्शन चेन्नूर (चौघेही रा.दातरंगेमळा, नालेगाव), संजय गंगाराम हंकारे (रा. पारशाखूंट),पोपट मधुकर पवार(रा.साकत), निकेश देवराम कांबळे(रा.आरणगाव), मोबीन आलमगीर शेख(रा.सारोळास्टेशन), निलेश शशीकांत गिरी (रा.भूतकरवाडी), संभाजी रामदस लोटके (रा.खंडाळा, ता.नगर), काळू मारूती शिंदे (रा.पाईपलाईन), अनिल भाउसाहेब खैरे(रा.पाईपलाईन), अरूण बाबुराव भिंगारदिवे(रा.सावेडी),साहेबराव रामचंद्र शिंदे(रा.वाघुंडे, ता.पारनेर), अनिल देवीदास सैंदर (रा.चितळे रोड) या 23 जुगार्‍यांना जंगुभाई तालीम येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून, नन्नू ऊर्फ ज्ञानेश्वर दौंडकर हा पळून गेला.

एक लाख 40 हजार 100 रुपये रोख, 50 हजार रुपये किमतीची एक दुचाकी, दोन लाख रुपये किमतीची एक कार, एक लाख 62 हजार रुपये किमतीचे 16 मोबाईल असा पाच लाख 52 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तर, पिंपळगाव रस्त्यावरील हॉटेल सिटी प्राईड जवळ पत्र्याच्या शेडमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यात 23 जुगार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सुरज मच्छिंद्र शिंदे (रा.वैदूवाडी), संदीप दामोदर गोरे (रा.नागापूर), भरत पुंडलीक ठाकरे (रा.वैशाखरे, जि.ठाणे), संतोष सोमनाथ शिंदे(रा.लोणी, ता.राहाता), राजू बाबू शिंदे (रा. वैदूवाडी), विकास नारायण बोठे (रा.भिस्तबाग), धिरज दिलीप निक्रड (रा.नागापूर), बुर्‍हा हकीम खान(रा.मथुरा), संदीप मोहन तारु (रा.पदमानगर), गोविंद राम इंगळे(रा.पाईपलाईन), दत्तात्रय देवराम शेळके (रा.धानोरा,आष्टी,जि.बीड), रविंद्र तुकाराम डोंगरे(रा.वडगावगुप्ता), महेंद्र शिवराम कदम (रा.एमआयडीसी), विठ्ठल नवनाथ कुटे, बाबासाहेब कारभारी जपकर, मनिष नवीनचंद सहाणी (तिघेही, रा.भिस्तबाग), बाळासाहेब महादेव तांबडे(रा.भिंगार), अजिज गुलाब शेख (रा.वडगावगुप्ता), इम्रान इलियास शेख, मुनावर सलीम शेख (दोघेही रा.वांबोरी, ता.राहुरी), सुशांत संजय फुंदे (रा.तपोवन रस्ता), सिराज जानमोहम्मद खान, राजू खॉ अज्जोदीन खॉ (दोघे रा.जुना पिंपळगाव रस्ता) अशी ताब्यात घेतलेल्या 23 जणांची नावे आहेत.

Back to top button