

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : वडगाव गुप्ता शिवारातून 16 वर्षांच्या मुलीला फूस लावून पळवून नेणार्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने शिर्डी येथून अटक केली. त्याला न्यायालयाने दि.8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. शुभम शरद गायकवाड (रा. बोल्हेगाव) असे आरोपीचे नाव आहे. वडगाव गुप्ता शिवारातील दूध डेअरी चौक परिसरातून शनिवारी (दि. 1) रात्री पावणेबाराच्या सुमारास संबंधित मुलीला पळवून नेण्यात आले होते.
तिच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्योती डोके, कॉन्स्टेबल नवनाथ दहिफळे, किशोर जाधव यांच्या पथकाने तपास केला. कोणताही पुरावा नसताना गोपनीय माहितीच्या आधारे शिर्डी येथून आरोपी शुभमला मुलीसह ताब्यात घेतले. दोघांना नगरला आणून मुलीला पालकांच्या ताब्यात दिले.