नगर : सात-बारावर नोंद नसलेल्या कांद्याबाबत विचार करू ; मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन | पुढारी

नगर : सात-बारावर नोंद नसलेल्या कांद्याबाबत विचार करू ; मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  सात-बारा उतार्‍यावर नोंद नसलेल्या कांद्याला अनुदान देण्यासाठी शासन विचार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कांदा विक्री व्यवहारात सात-बारा उतार्‍यांवर कांदा पिकाची नोंद नसलेल्या कांदा उत्पादकांना शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

बुधवारी राज्य कृषी पणन मंडळाची बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य सहकार व पणन विभागाचे मुख्य सचिव अनुपकुमार, पणनचे कार्यकारी संचालक दीपक शिंदे उपस्थित होते.
बैठकीत राज्य बाजार समिती व कृषी पणन अंतर्गत येणार्‍या विविध विषयांवर चर्चा झाली. राज्यातील बाजार समित्यांच्या काही रखडलेल्या प्रस्ताववर शासन तातडीने निर्णय घेईल. राज्य बाजार समिती महासंघाने शेतकरीहिताच्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

Back to top button