कोरडगाव : पाच तास रंगला मर्दानी खेळ..! नामवंत पैलवानांची हजेरी | पुढारी

कोरडगाव : पाच तास रंगला मर्दानी खेळ..! नामवंत पैलवानांची हजेरी

कोरडगाव; पुढारी वृत्तसेवा : हिंदु-मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या अवलियाबाबा यात्रोत्सवाची सांगता जंगी हंगाम्याने झाली. याप्रसंगी राज्यातील नामवंत पैलवानांनी हजेरी लावली. यात्रेच्या सांगता प्रसंगी कुस्त्यांच्या जंगी हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच व यात्रा कमिटीचे अध्यक्ष रवींद्र म्हस्के यांनी राज्यातून नामवंत पैलवानांना आमंत्रित केले होते. त्यामध्ये महाराष्ट्र केसरीसह नामांकित पैलवान, महिला कुस्तीगीरांनी उपस्थिती लावली.

कुस्त्याच्या फडाचा प्रारंभ रामगिरी महाराज, गर्जे महाराज शास्त्री, काळे महाराज, सभापती गोकुळ दौंड, तुकाराम पवार, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी, शिवसेना संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे, रमेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. तब्बल पाच तास डोळ्याचे पारणे फेडणारा मर्दानी खेळ कोरडगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांना अनुभवायला मिळाला.

वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यावेळी उपस्थित होते. पंच म्हणून उपसरपंच बाळासाहेब देशमुख, राहुल म्हस्के, आकाश म्हस्के, चंद्रकांत जायभाये, अशोक कांजवणे यांनी काम पाहिले. निवेदक म्हणून दिनेश गवळी यांनी काम पाहिले.
यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष रवींद्र म्हस्के व सदस्यांनी मेहनत घेतली.

यात्रेत सामाजिक सलोख्याचे दर्शन
या यात्रोत्सवात हजेरी लावत हिंदू-मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोख्याचे दर्शन घउविले. यात्रेनिमित्त वारकरी सांप्रदायाच्या प्रथेप्रमाणे दिंडीचे आयोजन करण्यात आले. तर, मुस्लिम समाजाने कुराण पठन केले. बाबांच्या मिरवणुकीमध्ये भगव्या ध्वजासह मुस्लिम बांधवांचा ध्वजही दिसत होता.

Back to top button