नगर : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ; शेवगावात 50 उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी

नगर : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ; शेवगावात 50 उमेदवारी अर्ज दाखल

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  शेवगाव बाजार समिती निवडणुकीसाठी 50 इच्छुकांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर, 101 नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी बुधवारी (दि.29) 26 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शुक्रवारी (दि.31) 50 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर 101 अर्जाची विक्री झाली आहे. सोमवारी (दि.3) अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असून, या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार आहेत. सर्व राजकीय पक्षांसह शेतकरी निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याने अर्ज दाखल होण्याची संख्या कमालीची राहणार आहे.

शुक्रवारी दाखल झालेले उमेदवारी अर्ज – सह.संस्था मतदार संघ सर्वसाधारण प्रवर्ग – बबन लबडे, बप्पासाहेब लांडे, लतिफ पटेल, प्रकाश हिंगे, संजय फडके, सुदाम तिडके, भारत मोटकर,जमीर पटेल, मंगेश थोरात, भास्कर खेडकर, सुधाकर तहकीक, शिरीष काळे, रोहित वाणी, काशीनाथ रुईकर, नानासाहेब मडके, अशोकराव धस, कृष्णा ढोरकुले, दादासाहेब माळवदे, भाऊसाहेब क्षीरसागर, राजेंद्र ढमढेरे, ज्ञानदेव विखे, भगवान तेलोरे. महिला राखीव – आशाबाई सातपुते, मथुरा तिडके, रेखा वाणी. इतर मागासवर्गीय प्रवर्ग – संजय फडके, रोहित वाणी, काशीनाथ रुईकर, मंगेश थोरात, हनुमान पातकळ. विमुक्त जाती/ भटक्या जमाती – भास्कर खेडकर, वसंत गव्हाणे, राजेंद्र दौंड. ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण प्रवर्ग – भाऊसाहेब फटांगडे, रंजना तानवडे, मल्हारी लंवाडे. दुर्बल घटक – सुरेश मडके, वर्षा पवार. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्ग – रतन मगर, अनिल इंगळे, अरुण खंडागळे, रुपाली आहेर. व्यापारी-आडते मतदारसंघ – संभाजी तिडके, साजिद सौदागर, अशपाक पठाण, मनोज तिवारी, विठ्ठल थोरात. हमाल-मापाडी मतदार संघ – सुदाम झाडे, प्रदीप काळे.

Back to top button