पाथर्डी : नगरपरिषदांतील विकासकामांसाठी 5 कोटी मंजूर : आ. मोनिका राजळे | पुढारी

पाथर्डी : नगरपरिषदांतील विकासकामांसाठी 5 कोटी मंजूर : आ. मोनिका राजळे

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी व शेवगाव नगरपरिषदेला राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत वौशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विकासकामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये पाथर्डी नगरपरिषदेच्या हद्दीतील 2 कोटी 98 लाख व शेवगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील 2 कोटी 2 लाखांची कामे समाविष्ट करण्यात आली आहेत.

पाथर्डी नगरपरिषदेमधील प्रभाग क्र.1 मधील वामनभाऊनगर मुख्य रस्ता ते दौंड घर, वामनभाऊनगर मुख्य रस्ता ते कचरे डॉक्टरपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, वामनभाऊनगर येथील गर्जे घर ते आव्हाड मॅडम घरापर्यंत भूमिगत गटार व रस्ता मजबुतीकरण, प्रभाग क्र.4 मधील रासने दुकान ते मरळीकर घर ते गटागट दुकान येथे रस्ता काँक्रिटीकरण, पाथर्डी नगरपरिषद जिल्हा परिषद शाळेजवळ बंदिस्त गटार, महादेव मंदिर ते जगताप वस्ती रस्ता मुरमीकरण व भराव, लाड घर ते शिरसाट घर (नाथनगर) रस्ता काँक्रिटीकरण, प्रभाग क्र. 1 सोळसे घर ते सरसे घर रस्ता काँक्रिटीकरण व खेडकर घर परिसर येथे भूमिगत गटार, प्रभाग क्र.1 मध्ये आनंदनगर येथील अशोक शिंदे घर ते विठ्ठल पाखरे घर रस्ता काँक्रिटीकरण, महादेव मंदिरासमोर सभामंडप, हॉटेल साई ते नांदणी नदी (मोरे वस्ती) पर्यंत बंदिस्त गटार, तनपुरवाडी एनएच हायवे ते पाठक घर रस्ता काँक्रिटीकरण, राजू मोरे घर ते बंटी मोरे घर रस्ता काँक्रिटीकरण, जि.प. शाळेजवळ शर्मा दुकान परिसर येथे बंदिस्त गटार, सुपेकर घर ते राजू इधाटे घर रस्ता काँक्रिटीकरण, साईनाथनगर येथील शेटे घर ते साई मंदिर पर्यंत भूमिगत गटार, मुळे घर ते बोरूडे घरापर्यंत भूमिगत गटार, जयंत फळे, वाणी घर ते उदबत्ते खानावळ मागील बाजू ते भंडारी घर रस्ता काँक्रिटीकरण, प्रभाकर गलांडे घर ते नरोटे घर रस्ता खडीकरण व काँक्रिटीकरण, प्रभाग क्र. 8 मध्ये शिंदे वस्ती ते मोहरी रोडपर्यंत खडीकरण व काँक्रिटीकरण, गरड वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, प्रभाग क्र.3 मध्ये नारायण डोमकावळे ते रावसाहेब मगर घर रस्ता पेव्हिंग ब्लॉक, सय्यद वाडा परिसर गटार व पेव्हिंग ब्लॉक, महादेव मंदिर ते जगताप वस्ती रस्ता मजबुतीकरण व बंदिस्त गटार, विश्वकर्मा मंदिर सुशोभिकरण या कामांसाठी निधी मिळाला आहे.

शेवगाव नगर परिषदेमधील प्रभाग क्र. 14 मध्ये शरद म्हस्के घर ते भराट घरापर्यंत रस्ता, वडार समाजासाठी सामाजिक सभागृह, श्रीराम कॉलनी येथे नियोजित बाल उद्यानासाठी संरक्षण भिंत, प्रभाग क्र. 7 देशपांडे गल्ली येथील वृंदावन गार्डन सुशोभिकरण, प्रभाग क्र.18 अंतर्गत वरूर रोड ते जाधव वस्ती ते मारुती मंदिर (डोईफोडे वस्ती) रस्ता खडीकरण, प्रभाग क्र.17 अंतर्गत ग्रामदैवत श्री खंडोबा मंदिरासमोर सभामंडप, प्रभाग क्र. 3 अंतर्गत पैठण रोड ते अंगणवाडी ते सर्जे घर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण,जुनंरकर घर ते आखेगाव रोड रस्ता काँक्रिटीकरण, आखेगाव रोड ते प्रशांत भराट घर रस्ता काँक्रिटीकरण, गोर्डे घर ते लांडे गिरणी रस्ता काँक्रिटीकरण, सचिन जाधव इस्त्रीवाले ते घेवारी घर रस्ता काँक्रिटीकरण, शिवाजी चौक ते धूत घर रस्ता काँक्रिटीकरण या कामांचा समावेश आहे.
पाथर्डी व शेवगाव नगरपरिषद हद्दीतील विकास कामांसाठी निधी दिल्याबद्दल आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. हा निधी मिळण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे सहकार्य लाभले.

Back to top button