राहुरी : रोहित्रांसाठी दीड कोटींचा निधी मंजूर; आ. प्राजक्त तनपुरे यांची माहिती | पुढारी

राहुरी : रोहित्रांसाठी दीड कोटींचा निधी मंजूर; आ. प्राजक्त तनपुरे यांची माहिती

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : माजी उर्जा राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांचे विशेष प्रयत्नातून सुमारे 21 नवीन रोहित्रे बसविण्यास सुमारे 1 कोटी 38 लाख 90 हजार रुपये खर्चास मंजुरी मिळाली आहे. यामुळे विजेचा प्रश्न मार्गी लागण्यास हातभार लागणार आहे. आमदार तनपुरे यांनी विशेष प्रयत्न केल्याने नव्याने रोहित्रे मिळाली आहेत. राहुरी मतदारसंघात ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात निधी मिळविण्यात आमदार तनपुरे यांनी मोलाचे यश संपादित केले. परिणामी शेतकर्‍यांच्या समस्या संपुष्टात येण्यास मदत झाली. नुकतेच बाभूळगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्पातील निर्मित वीज शेतकर्‍यांना लाभल्याने दिवसा वीजपुरवठा सुरू झाला.

हजारो शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळत असल्याचे आनंदोत्सव साजरा होत असतानाच राहुरी मतदारसंघातील नवीन वीज रोहित्रासाठी करंजी (क्षेत्रे वस्ती ता. पाथर्डी) 17 लाख 80 हजार, शंकरवाडी (भवार वस्ती, ता. पाथर्डी) 8 लाख 90 हजार, राघोहिवरे (मराठे वस्ती) 8 लाख 15 हजार, गीतेवाडी (वाघदरा) 8 लाख 20 हजार, करंजी (ता. पाथर्डी) 5 लाख, मिरी (तोडमल वस्ती, ता. पाथर्डी 5 लाख), शिराळ (घोरपडे वस्ती, ता. पाथर्डी) 5 लाख, आडगाव (सोन्नर, ता. पाथर्डी 5 लाख , पांगरमल (आव्हाड वस्ती, ता. नगर 4 लाख 58 हजार), नागरदेवळे (हजारे वस्ती, ता. नगर) 6 लाख, ताहराबाद (हराळे वस्ती, ता. राहुरी) 5 लाख 75 हजार, म्हैसगाव (हुलुळे वस्ती) 4 लाख 90 हजार, कोळेवाडी (गावठाण) 5 लाख 36 हजार, व (जाधव वस्ती) 4 लाख 90 हजार, जांभळी (पवार-बर्डे वस्ती) 5 लाख 65 हजार, गुहा (ओहोळ वस्ती) 6 लाख 82 हजार, कानडगाव (संसारे वस्ती) 8 लाख, सात्रळ (पडघलमल वस्ती) 7 लाख, सूर्यभान देवरे (शिलेगाव) 3 लाख 78 हजार, सात्रळ (पडघमल वस्ती पाणीपुरवठा) 7 लाख 46 हजार, ताहराबाद ( विधाटे वस्ती) 7 लाख 65 हजार असा निधी वितरित होऊन नवीन रोहित्रे बसणार आहे. यामुळे संबंधित गावातील लाभधारकांनी आमदार तनपुरे यांचे आभार मानले. राहुरी मतदार संघातील जनतेला दिलेल्या शब्दाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनसामान्यांच्या समस्या संपुष्टात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. उर्वरित समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगितले.

Back to top button