राहुरीतील घोरपडवाडीत महिलेला बेदम मारहाण | पुढारी

राहुरीतील घोरपडवाडीत महिलेला बेदम मारहाण

राहुरी;  पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतचे सदस्यपद रद्द होण्यासाठी अर्ज केला. सरकारी अधिकार्‍यांकडून त्याची पाहणी चालू असताना विठ्ठल येळे याने अर्चना बाचकर या महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालूक्यातील घोरपडवाडी येथे दिनांक 27 मार्च रोजी घडली. अर्चना आप्पासाहेब बाचकर (वय 35, रा. घोरपडवाडी, ता. राहुरी) यांचे पती आप्पासाहेब आंबादास बाचकर हे ग्रामपंचायत सदस्य आहेत.

विठ्ठल बाना येळे याने आप्पासाहेब बाचकर यांचे ग्रामपंचायतचे सदस्य पद रद्द होण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. दिनांक 27 मार्च रोजी दुपारी 12 वाजे दरम्यान राहुरी पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी, घोरपडवाडी येथील ग्रामसेवक तसेच सरपंच उषा सोन्याबाप बर्डे हे विठ्ठल येळे यांच्या अर्जाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांच्या पाठोपाठ विठ्ठल बाना येळे हा अर्चना बाचकर यांच्या घरासमोर आला. तेव्हा अर्चना बाचकर यांनी त्यास जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने येळे यांनी बाचकर यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्याने मारहाण करून जखमी केले.

Back to top button