संगमनेर : पोलिसांनी चोरीच्या 51 दुचाकी केल्या हस्तगत | पुढारी

संगमनेर : पोलिसांनी चोरीच्या 51 दुचाकी केल्या हस्तगत

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : नगर आणि नाशिक जिल्ह्यातील विविध मंगल कार्यालय आणि लॉन्सच्या बाहेर लावलेल्या मोटारसायकली चोरून नेणार्‍या एका अल्पवयीन मुलासह दोन अट्टल मोटरसायकल चोरांना पोलिस उपा धीक्षकांच्या विशेष पोलिस पथकाने पकडले. त्यांना विश्वासात घेत नाशिक, संभाजीनगर, वाशिम, पुणे व मध्यप्रदेशातील सेंधवा या पाच जिल्ह्यात विक्री केलेल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून हस्तगत केल्या असल्यामुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संपूर्ण नगर जिल्ह्यातील, मोटार सायकल चोरीच्या वाढत्या घटनारोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी तपासाबाबतच्या सूचना दिल्या होत्या. संगमनेर शहरातून मोठ्याप्रमाणात मोटार सायकली चोरीला गेल्या होत्या. त्यानुसार प्रभारी उपअधीक्षक संजय सातव, शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्ष कांच्या विशेष पथकातील कर्मचार्‍यांनी दुचाकी चोरीच्या घटनांस्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात पोलिसांच्या पथकाला एका अल्पवयीन मुलगा निदर्शनास आला. त्यास पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्या चोरट्यास मोटरसायकल चोरीबाबत विचारले असता अगोदर त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला खाकीचा हिसका दाखविताच त्याने अक्षय सावन तामचीकर (वय 18) व सूरजीत दिलीपसिंग तामचीकर (वय 22 दोघेही रा. भाटनगर, घुलेवाडी यांची नावे पोलिसांना सांगितली. पोलिसांनी त्या दोघांना मुसक्या आवळत गजाआड केले.

या दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी संगमनेर शहरासह, घारगाव, बोटा, आश्वी, राजूर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, वावी, नांदूर शिंगोटे, देवळाली कॅम्प, सिन्नर एमआयडीसी या भागातून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली.
या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत होत आहे.

पोलिस प्रमुखांकडून कामगिरीचे कौतुक
संगमनेर येथून मोठ्या प्रमाणात मोटर सायकली चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र पोलिस पथकाने विशेष कामगिरी करत दहा वीस नव्हे तर तब्बल 51 मोटरसायकली पोलिस उपाधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या कारवाईचे आपण स्वागत करत असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत बोलत या पोलिस कर्मचार्‍यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

Back to top button