पाथर्डी : कामत शिंगवेत दोघांवर चाकू हल्ला | पुढारी

पाथर्डी : कामत शिंगवेत दोघांवर चाकू हल्ला

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : मटक्याच्या पैशाच्या उधारीच्या कारणावरून कामत शिंगवेत दोघांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अर्जुन सुदामदेव कराळे,अमोल अशोक कराळे (दोघेही.रा कामत शिंगवे) अशी जखमींची नावे आहेत. रविवारी सायंकाळी शिंगवे गावातच ही घटना घडली. अक्षय दत्तात्रय मरकड (रा.निवडुंगे), लखन कासार (रा. कासारवाडी), सचिन जायभाये (रा. भगुर ता. शेवगाव), किशोर वांढेकर (रा.मोहोज)अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.

अर्जुन कराळे हे घरासमोर जनावरांना चारा टाकण्यासाठी गोठ्यात गेले असता चॉकलेटी रंगाची चारचाकी कार भाऊ सतिश कराळे याचे दारासमोर आली. त्यातून चौघे उतरले. सतिश कोठे आहे?, आम्हाला भारत वांढेकर यांनी पाठविले आहे. त्यांचे मटक्याचे उधारीचे राहिलेले पैसे देऊन टाका असे ते म्हणाले. ‘सतिश घरी नाही, तो आल्यावर घरी’ असे उत्तर उर्जन कराळे यांनी दिले. त्याचा राग आल्याने लखन कासारने चाकूने अर्जुन कराळे यांच्यावर हल्ला करुन जखमी केले.

अर्जुन यांचा चुलत भाऊ अमोल अशोक कराळे हा भांडण सोडवण्यासाठी आला असता त्यांच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला. छातीवर व तोंडावर चाकुचा मारुन लागून अमोल हे गंभीर जखमी केले आहेत. मारहाण, शिवीगोळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अर्जुन कराळे यांच्या फिर्यादीवरून अक्षय मरकड,लखन कासार,सचिन जायभाये,किशोर वांढेकर यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button