शेवगाव तालुका : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी गजाआड | पुढारी

शेवगाव तालुका : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी गजाआड

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत विनयभंग केल्याच्या फिर्यादीरून एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. हनुमान मोहन नलवडे (वय 48 रा. सोमठाणे ता. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना 14 मार्च रोजी घडली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली ही सोळा वर्षांची मुलगी पेन घेण्यासाठी महाविद्यालयातून बाहेर आली असता, ‘तुला घरी बोलावले आहे’ असे सांगून आरोपीने तिला मोटारसायकलवरून घरी सोडण्याच्या बहाण्याने अज्ञातस्थळी नेले.

तेथे ‘तू मला आवडतेस, तुझ्याशी संबंध करावयाचे आहेत,’ असे म्हणत तिला पैसे दिले. मुलीने पैसे घेण्यास नकार दिला, तेव्हा आरोपीने पैसे तिच्या बॅगेत टाकले; मात्र तिने पैसे आरोपीच्या अंगावर फेकले. त्या वेळी त्याने तिचा विनयभंग केला. लज्जास्पद कृत्य करीत हा प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. शेवगाव पोलिसांनी नलवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागूल तपास करीत आहेत.

Back to top button