मतदारसंघ विकासासाठी झटत राहणार : आ.आशुतोष काळे | पुढारी

मतदारसंघ विकासासाठी झटत राहणार : आ.आशुतोष काळे

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : सेवा करण्याची दिलेली संधी जनतेचा आशिर्वाद समजून मागील साडेतीन वर्षांमध्ये कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी झटलो. 1200 कोटीपेक्षा जास्त निधी मतदार संघाच्या विकासासाठी आणला. या निधीतून मतदार संघासह कोपरगाव शहरातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आदी विकासाचे मुलभूत प्रश्न मार्गी लावले. जनेतला दिलेल्या वचनांची पूर्तता केली. मतदार संघाच्या विकासासाठी यापुढील काळातही झटत राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. कोपरगाव येथे श्रीरामनवमी निमित्त श्रीसाईगाव पालखी सोहळा, मुंबादेवी तरुण मंडळ आयोजित ‘आदिशक्ती महात्म्य कथा’ महोत्सव पार पडला. या कार्यक्रमाला आ. आ. काळे उपस्थित होते. यावेळी श्रीसाई गाव पालखी व मुंबादेवी तरुण मंडळाने आ. काळे यांचा सत्कार केला. याप्रसंगी ते बोलत होते.

आ. काळे पुढे म्हणाले की, मागील 29 वर्षापासून साई पालखी कोपरगाव वरून शिर्डीला जात असून या पालखी सोहळ्यात कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील देखील असंख्य साईभक्तांना श्री साईगाव पालखी सोहळा, मुंबादेवी तरुण मंडळाच्या माध्यमातून ही धार्मिक संधी उपलब्ध करून देत आहे. जवळपास तीन दशकांचा साई पालखी प्रवास सुरु असून दिवसेंदिवस या धार्मिक सोहळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. साई भक्तांना धार्मिक कथा श्रवण करण्याचा लाभ श्री साईगाव पालखी सोहळा, मुंबादेवी तरुण मंडळाने दिला आहे. मागील वर्षापासून जीवघेण्या कोरोना संकटापासून दिलासा मिळाल्यामुळे आपण पुन्हा एकदा मोकळा श्वास घेवू लागलो आहे. त्यामुळे मागील वर्षापासून पुन्हा एकदा साई पालखी कोपरगाववरून शिर्डीला जात आहे. याचा तमाम साईभक्तांसह मला देखील विशेष आनंद वाटत आहे.

कोपरगाव शहराच्या विकासासाठी देखील कोट्यावधी रुपयांचा निधी शहरातील रस्ते, सुशोभिकरण, अमरधाम, समाजमंदिरासाठी दिला असून विकासाचे शिल्लक प्रश्न देखील लवकरच मार्गी लावणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी साईगाव पालखी व मुंबादेवी तरुण मंडळाचे सुनील फंड, संजय जगताप, संतोष चव्हाण, राहुल देवळालीकर, मनोज कपोते, रिंकेश खडांगळे, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, माजी नगरसेवक मंदार पहाडे, रमेश गवळी, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, सुनील बोरा, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैरनार, महेश उदावंत, शैलेश साबळे, रितेश राऊत, लक्ष्मण सताळे, गणेश बोरुडे, आकाश गायकवाड उपस्थित होते.

साठवण तलावाचे काम मार्गी लागणार
कोपरगाव मतदार संघाच्या विकासाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी जनतेच्या
आशिर्वादाने मतदार संघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढतांना कोपरगावकरांना मागील अनेक वर्षापासून भेडसावत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील 5 नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. 5 नंबर साठवण तलावाचे काम प्रगतीपथावर असून लवकरात लवकर कोपरगाव शहरातील नागरिकांना नियमित स्वच्छ व शुद्ध पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Back to top button