कोपरगाव : 8 दिवसांमध्ये 31,792 महिलांचा बसने प्रवास

कोपरगाव : 8 दिवसांमध्ये 31,792 महिलांचा बसने प्रवास
Published on
Updated on

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये प्रवास करणार्‍या महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलतीची महिला सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत कोपरगाव आगारातून अवघ्या 8 दिवसांमध्ये तब्बल 31, 792 महिलांनी एसटी बसच्या प्रवासास पसंती दिली. या आगारास 10.43 लाखांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती प्रभारी आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांनी दिली. दरम्यान, सवलतीमुळे एसटीने प्रवास करण्याकडे महिलांचा कल वाढलेला दिसत आहे, असे सांगत बनकर म्हणाले, शिर्डी हे आंतरराष्ट्रीय देवस्थान असल्याने राज्यभरातून शिर्डी येथे येणार्‍या भाविकांची मोठी संख्या आहे.

दूरवरून लांब पल्ल्याच्या बसेस बहुतांश कोपरगाव आगारातूनच इतरत्र धावतात. यामुळे या आगाराला मोठे महत्त्व आहे. आगारात एकूण 69 एसटी बसेस आहेत. शिवशाही 6, विठाई 15, लाल परी 42, सेमी लक्झरी 2, स्लीपर कोच 4 गाड्यांचा समावेश आहे. प्रवासात मुंबई, सातारा कोल्हापूर, गोंदवले, पंढरपूर, सोलापूर, सांगली, मध्यम पल्ल्याच्या प्रवासामध्ये छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, पुणे, नाशिक, बारामती, बीड, नगर या सारख्या शहरांचा तर ग्रामीण फेर्‍यांमध्ये श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, मनमाड, येवला तालुक्यातील गावांचा समावेश आहे.

कोपरगाव, संगमनेर आगारातून जाणार्‍या पुणे, नगर, नाशिक, पंढरपूर, बीड आदी ठिकाणी जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. 75 वर्षे वयाचे ज्येष्ठ नागरिकांनी 1 मार्च ते 24 मार्च अखेर 35,547 जणांनी मोफत प्रवास केला. कोपरगाव आगार सध्या 20 हजार कि. मी. बस गाड्या फेर्‍या करते. यातून दररोज 7 लाख रुपये उत्पन्न आजाराला मिळते. प्रवाशांसाठी अष्टविनायक दर्शन, पंढरपूर दर्शन, अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन, कोल्हापूर, तुळजापूर देवी दर्शन, रामदास स्वामींचे 12 मारुती आदी देवस्थानांकडे जाण्यासाठी पॅकेज टूर्स संकल्पना या आगारात उपलब्ध आहे.

मध्यम व ग्रामीण अशा तीन स्तरिय एसटी टी बस गाड्यांमध्ये 12 वर्षांपासून ते 65 वयापर्यंत अर्धे तिकिटात प्रवाशांना प्रवास करता येतो. सध्या परीक्षांचा कालावधी आहे 10 वीच्या परीक्षा झाल्या. यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी नियमित आहे, मात्र परीक्षांचा काळ संपल्यानंतर उन्हाळ्याची सुट्टी सुरू होणार आहे, असे बनकर यांनी पत्रकारांना सांगितले. यापुढेही एसटीने प्रवास करण्याचे प्रमाण वाढणार आहे. या योजनेला निश्चितच गती मिळेल, असे स. वा. नि. अविनाश गायकवाड म्हणाले.

40 कर्मचारी कमी
कोपरगाव आगारात 122 वाहक, चालक 142, यांत्रिक विभागात 65 कर्मचारी आहेत. सध्या येथे 20 चालक तर 20 वाहक अशी 40 कर्मचार्‍यांची कमतरता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news