नगर : ओपन प्लॉटच्या सातबारावर चढणार बोजा | पुढारी

नगर : ओपन प्लॉटच्या सातबारावर चढणार बोजा

नगर; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कर वसुली पथकाने वसुलीची जोरदार मोहीम सुरू केली असली तरी, ओपन प्लॅट, झोपडपट्टी, शासकीय कार्यालयांकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. आता मनपाने ओपन प्लॅटवर सातबार्‍यावर बोजा चढविला जाणार असल्याचे मनपाने जाहीर केले आहे. आर्थिक वर्षे संपत आले तरी मालमत्ताधारक कर भरण्याकडे कानाडोळा करीत आहे. अनेकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.

त्यामुळे प्रभाग समितीनिहाय वसुली मोहीम सुरू असून, थकीत मालमत्ताधारकांचे मालमत्ता सील करणे व नळ कनेक्शन तोडण्याची आक्रमक भूमिका मनपाने घेतली आहे. मालमत्ताधारकांकडून सर्वसाधारण कर, पथ कर, मलनिस्सरण, मलनिस्सरण लाभ कर, जललाभ कर, अवैध बांधकाम शास्ती, साफसफाई कर, घनकचरा कर, वृक्ष कर, पाणीपट्टी, शिक्षण कर, रोजगार हमी कर, मोठ्या निवासी कर यासह विविध गोष्टीसाठी मनपा मालमत्ताधारकांकडून कर वसुल करते.

मालमत्ताधारकांकडून चालू वर्षीची 47 कोटी 27 लाख 72 हजार 495 रुपयांची मागणी होती. मात्र, वसुलीची टक्केवारी कमी असल्याने महापालिका आयुक्तांना कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगरला होता. त्यात खुले भूखंड, न्यायलयीन वादातील मालमत्ता, झोपडपट्टी, शासकीय कार्यालये, मोबाईल टॉवर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. महापालिकेच्या वसुली विभागाने आता वरील थकबाकीदारांकडे मोर्चा वळविला आहे.

खुले भूखंड मालमत्ताधारकांकडे थकीत कर असल्यास त्याच्या सातबार्‍यावर बोजा चढविला जाणार आहे. नगर ः पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या कर वसुली पथकाने वसुलीची जोरदार मोहीम सुरू केली असली तरी, ओपन प्लॅट, झोपडपट्टी, शासकीय कार्यालयांकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. आता मनपाने ओपन प्लॅटवर सातबार्‍यावर बोजा चढविला जाणार असल्याचे मनपाने जाहीर केले आहे.
आर्थिक वर्षे संपत आले तरी मालमत्ताधारक कर भरण्याकडे कानाडोळा करीत आहे. अनेकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.

त्यामुळे प्रभाग समितीनिहाय वसुली मोहीम सुरू असून, थकीत मालमत्ताधारकांचे मालमत्ता सील करणे व नळ कनेक्शन तोडण्याची आक्रमक भूमिका मनपाने घेतली आहे. मालमत्ताधारकांकडून सर्वसाधारण कर, पथ कर, मलनिस्सरण, मलनिस्सरण लाभ कर, जललाभ कर, अवैध बांधकाम शास्ती, साफसफाई कर, घनकचरा कर, वृक्ष कर, पाणीपट्टी, शिक्षण कर, रोजगार हमी कर, मोठ्या निवासी कर यासह विविध गोष्टीसाठी मनपा मालमत्ताधारकांकडून कर वसुल करते.

मालमत्ताधारकांकडून चालू वर्षीची 47 कोटी 27 लाख 72 हजार 495 रुपयांची मागणी होती. मात्र, वसुलीची टक्केवारी कमी असल्याने महापालिका आयुक्तांना कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगरला होता. त्यात खुले भूखंड, न्यायलयीन वादातील मालमत्ता, झोपडपट्टी, शासकीय कार्यालये, मोबाईल टॉवर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. महापालिकेच्या वसुली विभागाने आता वरील थकबाकीदारांकडे मोर्चा वळविला आहे. खुले भूखंड मालमत्ताधारकांकडे थकीत कर असल्यास त्याच्या सातबार्‍यावर बोजा चढविला जाणार आहे.

खुले भूखंड : 33 कोटी
वादातील मालमत्ता : 25 कोटी
झोपडपट्टी : 19 कोटी
शासकीय कार्यालये : 11 कोटी
मोबाईल टावर : 10 कोटी

खुले भूखंड धारकांकडून मनपा कर आकारणी करते. मात्र, भूखंड मालक कर भरणा करीत नाहीत. त्यामुळे मनपा आता सातबारावर बोजा चढविणार आहे.

                                              – डॉ. पंकज जावळे, आयुक्त मनपा

Back to top button