उंबरी बाळापूरमध्ये 2 लाखांचे सोने चोरीस | पुढारी

उंबरी बाळापूरमध्ये 2 लाखांचे सोने चोरीस

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे चोरट्यांनी दत्तात्रय निवृत्ती सातपुते यांच्या घरातून साडेसात तोळे सोन्यासह 16 हजाराची रोकड असा एकूण 2 लाख 3, 500 रुपयांचा मुद्दे माल चोरुन नेल्याची घटना बुधवारी रात्री घडल्याने खळबळ उडाली आहे.
उंबरी बाळापूर येथील दत्तात्रेय सातपुते राहाता तालुक्यातील नांदुर्खी येथे सासुरवाडीस कामानिमित्त गेले होते. त्याच रात्री 10ः45 वाजेच्या सुमारास मुलगा राहुल याने घरी चोरी झाल्याचे सातपुते यांना फोनवरून दिली.

घरी आल्यानंतर सातपुते यांनी घरातील वस्तूंची पहाणी केली असता, 75 हजार रुपयांचे 3 तोळे सोन्याच्या गंठणासह सोने- चांदीच्या दागिने व 16 हजाराची रोकड असा 2 लाख 3, 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून पोबारा केला. दत्तात्रय सातपुते यांनी आश्वी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याच्या विरोधात घर फोडीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये चोर्‍यांसह दरोडे पडण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button