जवळा : कांद्यानी पार सपान भंगलं..रं बाबा.! | पुढारी

जवळा : कांद्यानी पार सपान भंगलं..रं बाबा.!

जवळा; पुढारी वृत्तसेवा : काय कष्टाचं चीज न्हाई रं बाबा..कांद्यानी लय मातीत घालायचं काम केलं.. रं, सगळी हौस.मौज..सपनं..चं चक्काचुर झालं. अशी खंत पिंप्री जलसेनच्या महिला शेतकर्‍यांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली. पारनेर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिंप्री जलसेन, सांगावी सूर्या, जवळा, गांजीभोयरे, कुरुंद कोहकडी, राळेगण, थेरपाल म्हसे, निघोज गावांतील कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. परंतु, कांद्याचे भाव गडगडले असून, शेतकर्‍या ना नीलाजस्तव मातीमोल भावाने कांदा विक्री करावा लागत आहे.

त्यामुळे शेतकरी चिंतीत दिसत आहे. कांदा लागवडीपासून काढणीपर्यंतच्या खर्चाची भागाभाग तर सोडाच, उलट खिशातून पैसे जाता आहेत. आमाप पैसे खर्चून लावलेला कांदा काढण्यासाठी शेतकर्‍यांना खिशातूनच खर्च करावा लागत आहे. भाव कमी असल्याने लागवडीसह काढणीचाही खर्च शेतकर्‍यांना परवडेना. परंतु, लावलेला कांदा काढणे शेतकर्‍यांना भाग आहे.

त्यामुळे शेतकरी कांदा काढणीत व्यास्त दिसत आहे. एकरी सुमारे 40 ते 50 हजाराचा खर्च कांदा रोपे, लागवड, खते, औषधे, मजुरीचा खर्च करून स्वतः रात्रंदिवस कष्ट केलेले पिक वार्‍यावर सोडूनही हातात पैसे मात्र काहीच पडत नाहीत. इतकी वाईट परिस्थिती कांद्याने शेतकर्‍यांवर आणली आहे.

एकरी सुमारे 20 ते 25 हजारांचा तोटा
एकरी सुमारे 20 ते 25 हजारांचा तोटा होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे वार्षिक गणित बिघडून त्यांच्या स्वप्नांना मूठमाती द्यावी लागत आहे. तरी, सरकारला कशी जाग येईना, असा सवाल शेतकर्‍यांमधून होत आहे. कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जाऊ लागला आहे.

Back to top button