पाथर्डी : रस्त्यांच्या कामांसाठी 5 कोटी रूपये निधी : आमदार मोनिका राजळे | पुढारी

पाथर्डी : रस्त्यांच्या कामांसाठी 5 कोटी रूपये निधी : आमदार मोनिका राजळे

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : शेवगाव व पाथर्डी मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. शेवगाव तालुक्यातील अंतरवली बु. ते उगले वस्ती डांबरीकरणासाठी 40 लाख रुपये, मडके गावातील रस्त्यासाठी 40 लाख, कांबी येथील रस्ते काँक्रिटीकरणासाठी 30 लाख, गोळेगाव येथील डांबरीकरणासाठी 30 लाख, दहिगावने येथील रस्ता डांबरीकरणासाठी 30 लाख, मळेगाव येथील रस्ता डांबरीकरणासाठी 40 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

तसेच, पाथर्डी तालुक्यातील खरंवडी कासार येथील पुलासाठी 40 लाख रुपये, कोरडगाव येथील रस्ते काँक्रिटीकरण व बंदिस्त गटारीसाठी 40 लाख, हनुमानटाकळी येथील रस्ते डांबरीकरणासाठी 50 लाख, ढवळेवाडीतील दुसंग वस्ती रस्ता डांबरीकरण 30 लाख, अकोले येथील करोडी रोड ते दातीरवाडी रस्ता डांबरीकरण 35 लाख, येळी येथील रस्त्यासाठी 25 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
स्थगिती मिळालेल्या जवखेडे खालसा येथील डांबरीकरण 30 लाख, भालगाव येथील मच्छिंद्रनाथगड रस्ता डांबरीकरणासाठी 40 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

Back to top button