पाथर्डी : नारळी सप्ताहाला पंकजा मुंडे येणार; ग्रामस्थांनी दिलेले निमंंत्रण स्वीकारले | पुढारी

पाथर्डी : नारळी सप्ताहाला पंकजा मुंडे येणार; ग्रामस्थांनी दिलेले निमंंत्रण स्वीकारले

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : संत भगवान बाबांच्या नारळी सप्ताहचे निमंत्रण माजी मंत्री तथा भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना तालुक्यातील भारजवाडी ग्रामस्थांनी दिले.सप्ताहाच्या सांगतेला म्हणजे 11 एप्रिल रोजी भारजवाडीत येण्यासाठी मुंडे यांनी होकार दिला.
संत भगवान बाबांनी सुरू केलेला नारळी सप्ताह यावर्षी भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या भारजवाडी गावात होत आहे. मुंडे अनेक वर्षांनंतर भगवान गडाच्या पायथ्याशी येत आहेत.

भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय कीर्तने, भारजवाडीचे सरपंच माणिक बटुळे, भारत नागरे, अशोक बांगर, पप्पू बटुळे, अंबादास कराड, बाळासाहेब बटुळे, वामन कीर्तने, पिराजी कीर्तने, भास्कर कराड, सोमनाथ बटुळेे, रामकिसन बटुळे, गणेश सानप, शंकर बटुळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंबेजोगाई येथे जाऊन मुंडे यांची भेट घेऊन सप्ताहाला येण्याचे निमंत्रण देण्यात आले.

संत भगवान बाबांचा नारळी सप्ताह म्हणजे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्वाभिमानाचा विषय बनला होता. स्व.मुंडे यांच्यानंतर कन्या पंकजा मुंडे त्यांचा वारसा जपत आहेत. पंकजा मुंडे सप्ताहाला उपस्थिती लावत आहेत. पाथर्डी तालुक्याचे मुंडे घराण्यावर प्रचंड प्रेम आहे. संत भगवान बाबा व गापीनाथ मुंडे हेच दैवत असल्याची भावना येथील जनतेची आहे. मी संत भगवान बाबांची भक्त असून, मी येईल, असे मुंडे यांनी ग्रामस्थांना सांगितले. सप्ताह कालावधीत लाखो भाविक उपस्थिती लावतात. त्यात आता भारजवाडीत पंकजा मुंडे सप्ताहानिमित्त सांगता सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याने ग्रामस्थांच्या भक्तीच्या आनंद सोहळ्यात भर पडली आहे

Back to top button