कोपरगाव : ड्रोन फवारणीत ‘कोल्हे’ चा आधुनिक टप्पा : पंजाबराव डख | पुढारी

कोपरगाव : ड्रोन फवारणीत ‘कोल्हे’ चा आधुनिक टप्पा : पंजाबराव डख

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : सहकारमहर्षी, महाराष्ट्राचे जाणते नेते, संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक शंकरराव कोल्हे यांनी शेती, पाणी, वीज, रस्ते विकासाच्या पंचसूत्रीत शेतीमधील पायाभूत सुविधांना जास्तीत जास्त प्राधान्य देत शेतकर्‍यांचा विकास कसा होईल, हा दूरदृष्टिकोन ठेवला. त्यांची तिसरी पिढी ड्रोन फवारणी शेती तंत्रज्ञान थेट बांधावर नेऊन शेतकर्‍यांच्या समस्या कमी कशा होतील, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केले.

स्व. शंकरराव कोल्हे यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त रवंदे येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. त्यात ते बोलत होते. डख म्हणाले, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना हा ड्रोन तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन आधुनिक शेतीकडे वळवणारा कारखाना आहे, या ड्रोन सुविधेच्या उपलब्धतेची नोंद सुवर्ण अक्षरांनी होईल. संजीवनी समृद्धी योजनेद्वारे सेंद्रिय खत व सेंद्रिय गंधक हे सवलतीच्या दरात देणार आहे. अमूल्यख अ‍ॅग्रोटेकचे राहुल मुगदुम यांनीही मार्गदर्शन दिले.

भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते शिंगणापूर येथे 30 कोटी खर्चाची जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना भूमिपूजन तर शहरात वैकुंठरथ, प्रवचन ओटा, अस्ती कलश कपाट आदींचे लोकार्पण करण्यात आले. कृषिरत्न दत्तात्रय कोल्हे, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर, उपाध्यक्ष बाजीराव मांजरे व सर्व संचालकांनी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांचे शेती विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला.

या प्रसंगी शिवशंकर सोसायटीचे अध्यक्ष साहेबराव कदम, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेशराव घोडेराव, शिवाजीराव कदम, संभाजी गावंड, केशव भवर, ज्ञानेश्वर परजणे, मनेष गाडे, विलास माळी, बापू बारहाते, फकीराव बोरनारे, निलेश देवकर, साहेबराव रोहम, भाऊसाहेब भाकरे, सुनील देवकर,जयराम गडाख, बिच्छू नाना जाधव,भाऊसाहेब कदम, डॉ. राजकुमार दवंगे, रंजनाताई आढाव आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व विविध संस्थाचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

ड्रोन फवारणीस मदत करणार : कोल्हे
जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेक कोल्हे यांनी ड्रोन फवारणी संदर्भात माहिती देऊन शेतकरी सेवा संस्था जर पुढाकार घेत असतील तर त्यांना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी घोषणा त्यांनी यावेळी जाहीर केली.

 

Back to top button