बोटा : चिकनवरून हॉटेल मालकास मारहाण | पुढारी

बोटा : चिकनवरून हॉटेल मालकास मारहाण

बोटा; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर गावातील आसरा खानावळमध्ये मद्यपान करून आलेल्या ग्राहकाने चिकन शिजले नाही, भाजीला चव नाही म्हणत हॉटेल मालकास धक्काबुक्की,मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. पठार भागातील साकुर गावात येथील हॉटेल व्यावसायिक अजीज खुद्उद्दिन सय्यद यांचे बस स्टँडजवळ आसरा खानावळ हॉटेल आहे.

या खाणावळीच्या हॉटेल व्यवसायातून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. गुरुवार (दि. 23) रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास अजीज सय्यद हे हॉटेलच्या काऊंटरवर बसले असताना त्यांचे ओळखीचे मांडवे बुद्रुक गावचे सूर्यभान बाचकर हे ग्राहक जेवणासाठी आले. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. बाचकर यांना चिकन व बाजरीच्या भाकरीचे जेवण दिले. बाचकर यांचे अर्धे जेवण झाल्यानंतर त्याने चिकन शिजले नसल्याचे कारणावरून वेटरशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली.

हॉटेल मालक बाचकर यांना समजावून सांगण्यास गेले असता आरोपीने हॉटेल मालक सय्यद यांना शिवीगाळ,दमदाटी करत धक्काबुक्की केली. याप्रकरणी आसरा हॉटेल मालक अजीज खुद्उद्दिन सय्यद यांचे फिर्यादीनुसार सूर्यभान बाचकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठार भागात दमबाजीचे प्रकारामध्य वाढ होत आहे.

 

Back to top button