श्रीरामपुरात 850 किलो गोमांस जप्त | पुढारी

श्रीरामपुरात 850 किलो गोमांस जप्त

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील मुस्लिम मोहल्यात शहर पोलीसांनी मध्यरात्री केलेल्या धडक कारवाईत साडेआठशे किलो गोमांसासह एकास अटक केली. तर एकजण पसार झाला. गुरुवारी मध्यरात्री वार्ड नंबर 2 मधील नुरए इलाही चौक परीसरात एका घराच्या आडोशाला गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी वार्ड नंबर दोन मधील नुर ए इलाही चौक परीसरात एका घराच्या आडोशाला छापा टाकला असता, त्या ठिकाणी दोघेजण गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळून आले.

या दोघांवर पोलिसांनी झडप घालुन पकडण्याचा प्रयत्न केला असता या झटापटीत एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. शाहरुख सलीम कुरेशी (वय 26) या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. पकडण्यात आलेल्या आरोपीकडे पसार झालेल्या आरोपीचे नाव विचारले असता त्याचे नाव त्याने वसीम इसाक कुरेशी असे सांगितले. या ठिकाणाहून पोलिसांनी 1 लाख 27 हजार रुपये किमतीचे 850 किलो गोमास जप्त केले आहे.

Back to top button