कोळपेवाडी : अल्पसंख्याकांना विकास प्रवाहात आणले : आ. आशुतोष काळे | पुढारी

कोळपेवाडी : अल्पसंख्याकांना विकास प्रवाहात आणले : आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा : सर्व समाजाला समसमान न्याय देताना अल्पसंख्याक समाजाला देखील विकासाच्या बाबतीत समान न्याय दिला आहे. अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवून अल्पसंख्याक समाजबांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे. वैशिष्ट्यपूर्ण ठोक अनुदान योजने अंतर्गत कोपरगाव शहरातील सुतार-लोहार समाजाच्या समाजमंदिर कामाचे भूमिपूजन आ. काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

आ. काळे म्हणाले की, मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मतदारसंघातील प्रत्येक जाती धर्माचे, पंथाच्या नागरिकांचे विकासाचे प्रश्न सोडविणे ही माझी जबाबदारी आहे. कोपरगाव शहरातील सर्व समाजाच्या समाज मंदिराबरोबरच सुतार-लोहार समाजाच्या मागणीवरून समाज मंदिरासाठी निधी दिला आहे. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजातील युवा वर्गाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या प्रगतीमधील अडचणी दूर करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

अल्पसंख्याक समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करून त्यांना शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणार्‍या सोई सवलती व योजनांचा लाभ मिळवून देण्यायासाठी सर्वोतोपरी सहकार्य करून त्यांचा विकासाच्या मुख्य प्रवाहातील अधिकचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आ. काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सुतार लोहार समाज संघटनेचे अध्यक्ष विजय जाधव, उपाध्यक्ष वामनराव कदम, सचिव दत्तात्रय क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, चंद्रशेखर म्हस्के, संदीप कपिले, अंबादास वडांगळे, राजेंद्र खैरनार, विकास बेंद्रे, चांदभाई पठाण, मनोज नरोडे, सचिन गवारे, शैलेश साबळे, डॉ. शिवाजी रोकडे, राजेंद्र आभाळे, एकनाथ गंगूले, इम्तियाज अत्तार, राजेंद्र जोशी, दिनेश पवार, पुंडलिक वायखिंडे,उपस्थित होते.

Back to top button