बोटा : रोहित्रातून 150 किलो तांब्याच्या तारेची चोरी | पुढारी

बोटा : रोहित्रातून 150 किलो तांब्याच्या तारेची चोरी

बोटा; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील नांदुर खंदरमाळ शिवारातील येथील गुरुदत्त स्टोन क्रशर जवळील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे 100 के. व्ही. ट्रान्सफार्मरची 80 हजार रुपयांची 150 किलो तांब्याची क्वॉईल खोलून लंपास केल्याची घटना बुधवार दि.22 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. पठार भागात नांदूर खंदरमाळ शिवारातील एकोणविस मैलाजवळील गुरुदत्त स्टोन क्रशरजवळील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे 100 के. व्ही.चे ट्रान्सफॉर्मर आहे.

बुधवारी रात्री 12:10 वाजताच्या नंतर व सकाळी 6 वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरचा विद्युत प्रवाह बंद करून ट्रान्सफॉर्मर खोलले. त्यातील ऑईल सोडून दिले. ट्रान्सफॉर्मरमधील साधारण 80 हजार रुपयांची 150 किलो तांब्याची तार लंपास केली आहे. या प्रकरणी नोकरदार रामदास पांडुरंग पोरे यांनी घारगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शन नुसार स. फौ. आर. व्ही.खेडकर करत आहे. पठार भागात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. शेती उपयोगी वस्तूंच्या चोर्‍या तर होत आहे. परंतु आता हे चोर शासकीय मालमत्तेवर देखील डल्ला मारत आहेत.

Back to top button