नगर : कॉफी कॅफेत अश्लिल चाळे करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई | पुढारी

नगर : कॉफी कॅफेत अश्लिल चाळे करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

नगर; पुढारी वृत्तसेवा : तरुण-तरुणींना अश्लील हावभाव अथवा अश्लील कृत्ये करण्यास सुलभता मिळावी, तसेच अशी कृत्ये करण्यास त्यांना जागा उपलब्ध करून देऊन त्याबदल्यात तासाप्रमाणे पैसे घेणार्‍या शहरातील तीन कॉफी कॅफेवर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली छापे घालून कारवाई करण्यात आली.

नगर शहर परिसरातील चाणक्य चौकातील रिच किंग कॅफे, भोसले आखाडा येथील बेला कॅफे, चाणक्य चौकातील कॅरेमेला कॅफे या तीन कॅफेंवर ही कारवाई करण्यात आली आहे. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॉफी कॅफेबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकाने कॉफी कॅफेची अचानक तपासणी केली असता वरीलप्रकार आढळून आला. तसेच या कॅफेवर विनापरवाना खाद्य गृहातून खाद्य पदार्थांची ग्राहकांना विक्री करताना आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायद्याप्रमाणे खटला दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस हेडकॉन्स्टेबल सतीश भांड, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, श्रीकांत खताडे यांच्या पथकाने केली.

Back to top button