स्नेहलता कोल्हेंचा कोपरगाव-संगमनेर बस प्रवास | पुढारी

स्नेहलता कोल्हेंचा कोपरगाव-संगमनेर बस प्रवास

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने महिलांना एसटी बस प्रवासात सरसकट 50 टक्के सूट देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत अंमलबजावणी सुरू केली. भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून कोपरगाव बस स्थानकावर महिलांसह आनंदोत्सव साजरा केला. विशेष असे की, स्वत: कोल्हे यांनी तिकिट घेत कोपरगाव-संगमनेर एस. टी. बसमधून महिला प्रवाशांसोबत प्रवासाचा आनंद लुटला!

कोपरगाव एस. टी. स्थानकावर स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीने आनंदोत्सव साजरा केला. नारी शक्तीचा विजय असो.., शिंदे-फडणवीस सरकारचा विजय असो…, 50 टक्के एकदम ओके.., अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या.
यावेळी स्नेहलता कोल्हे यांनी एसटीमधून प्रवास करणार्‍या नायब तहसीलदार गोरे, वयोवृद्ध महिला मीनाबाई भारूड (संवत्सर) आदी महिला व मुलींना गुलाब पुष्प व पेढे वाटून आनंद साजरा केला. महिलांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षा वैशाली आढाव, शिवसेना शिंदे गट महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विमल पुंडे, अशोक लकारे, विद्या सोनवणे, शिल्पा रोहमारे, विजया देवकर, हर्षा कांबळे, नंदा भंडारी, अनिता साळवे, मीना भारूड, सविता परदेशी, सुरेखा आवारे, भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, भाजयुमो तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक, विनोद राक्षे, दीपक चौधरी, शहर सरचिटणीस जयेश बडवे, वाहतूक नियंत्रक आशिष कांबळे, मुकुंद बिडवे एसटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बसस्थानक स्वच्छ ठेवा.. चांगल्या सुविधा द्या..!
एसटी बसस्थानक परिसरात अस्वच्छता पाहून स्नेहलता कोल्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना त्यांनी आगार व्यवस्थापक अविनाश गायकवाड यांना केली. सूचनेची तत्काळ दखल घेत, बस स्थानकातील कचरा काढून स्वच्छता केली. शहरात नवे सुसज्ज व अद्ययावत बस स्थानक बांधण्यास शासनाकडे पाठपुरावा करून, 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, असे सांगत आवश्यक मार्गावर बसेस सोडून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशा सूचना कोल्हे यांनी केल्या.

Back to top button