नगर : खोटे सोने ठेवून केली 4 कोटींची फसवणूक | पुढारी

नगर : खोटे सोने ठेवून केली 4 कोटींची फसवणूक

 संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  नाशिक मर्चंटस को-ऑपरेटीव्ह बँकेच्या संगमनेर शाखेचे माजी व्यावस्थापक व व्हॅल्युअर यांच्यासह 136 कर्जदारांनी संगनमताने 4 कोटी 20 लाख 15 हजार 807 रुपयांचा अपहार केला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी बँकेच्या माजी व्यवस्थापकासह संगमनेर शहर आणि तालुक्यातील 136 जणांवर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात फार मोठी खळबळ उडाली आहे.

नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव बँकेची संगमनेर शहरातील गायत्री सोसायटीत शाखा आहे. या शाखेत 1 नोव्हेंबर 2021 ते 2 फेब्रुवारी 2023 पर्यंत सोने तारण कर्ज दिले जात होते. हे सोने बँकेत गहाण (तारण) ठेवले जात होते. सोने गहाण ठेवताना अधिकृत गोल्ड व्हॅल्युअर मार्फत सोन्याचे बँक व्हॅल्युएशन करून घेतले जात होते. तसा मुल्यांकनाचा शेरा व दाखला घेऊन बँक व्हॅल्युअरने दिलेल्या सोन्याच्या मूल्यांकनाचे आधारे कर्ज दिले गेले होते. अशा प्रकारे सोन्याचे दागिन्यांचे मूल्यांकन करण्यासाठी बँकेने जगदिश लक्ष्मण शहाणे याला अधिकृत व्हॅल्युअर म्हणून दि. 19 डिसेंबर 2014 ला नियुक्त केले होते. त्याने केलेल्या मुल्यांकनाच्या आधारावर बँकेने विविध ग्राहकांना कर्ज दिले होते.

या प्रकरणात 136 खातेदार आहेत. त्यापैकी 12 खातेदारांनी त्यांचे कर्ज खाते बंद केले असून 124 खातेदार शिल्लक राहिले आहेत. यांच्याकडून 4 कोटी 20 लाख 15 हजार 807 रुपये येणे बाकी आहे. हा सर्व प्रकार बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी योगेश बाळासाहेव पवार याचे कार्यकाळामध्ये घडला.

यानंतर नाशिक मर्चंट बँकेचे विद्यमान व्यवस्थापक निलेश नाळेगावकर यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्कालीन व्यवस्थापक योगेश पवार याच्यासह खालील 136 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आता नेमके या बनावट सोने गहाण ठेव णार्‍यांवर पोस काय कारवाई करतात याकडे संगमनेर करांचे लक्ष लागून आहे.

खालील व्यक्तींवर शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अकिला आजीज शेख, राजेश विश्वनाथ पवार, सचिन मरनलभाऊ होलम, सागर भारत मंडलिक, आसिफ अल्लाउद्दीन शेख, तात्राबाई रावजी घुगे, मंगेश चंद्रकांत ढोले, वैभव प्रकाशे, बाबुराव गाडे, रमेश बाबुराव गाडे, नितीन किसन साळुंकर, सविता दीपक जाधव, सुधीर रावसाहेब घुगे, अमोल पोपट खेंगळे, बाळासाहेब विष्णू मेंढे, दीपक काखण बडशाळे, स्वाती अनिल मंडलिक, मनोज कचरु हटम, योगेश शंकर सूर्यवंशी, संजय दिलीप म्हैसे, शशिकला विश्वनाथ पवार, रवींद्र रमेश राजगुरु, विशाल काशिनाथ वाकचौरे, रुपाली जीवन परदेशी, अजयकुमार भाऊसाहेब थोरात, योगेश रामनाथ वाकचौरे, संदीप भाऊसाहेब सानप, प्रकाश मारुती तुपसुंदर, संदीप नंदू काळंगे.

प्रतिक नानासाहेब केरे, शशिकांत मिनानाथ पांडे, योगेश दत्तात्रय जाधव, प्रसाद संजय वर्पे , ज्ञानेश्वर ठकाजी यारंगणर, ज्ञानेश्वर ठकाजी यरमाळ, रंजना गोरख पावबाके, शाम प्रल्हाद डहाळे, लक्ष्मण विठ्ठल राऊत, मीना दिलीप भारती, आयुब उस्मान पठाण, शरद मारुती परबत, गुरुनाथ पाटील, राहुल ज्ञानेश्वर गुरकुले, उषा एस दुधवडे, दीपक दादू आव्हाड, निकिता विशाल वाकचौरे, प्रियंका राजेंद्र वाकचौरे, अण्णासाहेब मंडलिक, लखन शांताराम कडलग, गोरक्ष आर. गाडेकर, प्रमोद सुदाम वाहुल, मारुती लिंबा खेमनार, मनोज मच्छिंद्र ढमाले.
तसेच नवनाथ चंद्रभान खंडाळे, रवींद्र ज्ञानदेव जाधव, राहुल सतीश पोटे, साक्षी सतीश पोटे, संदीप बाळासाहेब गुळावे, रांजना गोरख पावबाके, विजय रामनाथ पावसे, सुरा उत्तम जाधव, सुनील खंडू बटवाल, शालिनी प्रमोद वाव्हळ, मिनिनाथ राजाराम सानप, सिद्धार्थ संतू दारोळे, भानुदास यशवंत ढगे, मंगेश रावसाहेब घुगे, मनोज राजेंद्र बांगर, विनोद भानुदास ढगे , ज्योत्स्ना प्रशांत भुजबळ, जय तपेंद्रबहादूर सुनार, अरविंद मारुती पावसे , प्रकाश विश्वनाथ पवार , स्वाती प्रकाश पवार, चंचल रमेश गाडे, काजल प्रतिक केरे, विजय भास्कर अवचिते, सुरेश फकिरा भालेराव, संदीप गोरक्ष अवचिते , सोमनाथ भीमराज जाधव, सचिन जगन्नाथ अवचिते.

गजला आयुब पठाण, नवनाथ भरत घोडेकर, मच्छिंद्र एकनाथ मंडलिक, सुषमा एम. अधिकारी, रितेश संतोष साळवे , रंजना प्रकाश तुपसुंदर, अक्षय रमेश गाडे, कृष्णा भाऊसाहेब गाढवे , रवींद्र दत्तू घोडेकर, किरण रघुनाथ रहाणे, नवनाथ मारुती ढोले, डिंपल संतोष वालझाडे , कोमल संजय भोसले, दानिश अय्युब पठाण, योगिता राहुल गुरुकुळे, संतोष माधव लहरे, गणेश भाऊसाहेब अवचिते, माधव दादा लहारे, नामदेव भीमराज जाधव, सुनील गंगाधर ताम्हाणे.

महेश जोशी , राजू एकनाथ बोरकर, उषा माधव लहारे, शांत मच्छिंद्र पावबके, ज्योती महेश जोशी, मिना कैलास गोफणे, गणेश सूर्यभान खेमनार, सचिन मोहन उपरे, मुकुंद मुरलीधर उपरे, कैलास सोमनाथ गोफणे, राहुल बाजीराज गुळवे, भाऊसाहेब जगन्नाथ पवार, संतोष सखाराम सूर्यवंश, अमृतराज किसन वाघमारे, संजय कुंडलिक साळवे, सुनील रघुनाथ अवचिते, विशाल विठ्ठल कुडनार , रवी महेश श्रीवास (सर्व रा. संगमनेर शहर तसेच तालुका) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

….महाराष्ट्र ग्रामीणचे आरोपी नाशिक मर्चंटमध्येही
संगमनेर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खोटे सोने गहाण ठेवून कर्जदारांनी बँकेची फसवणूक केली होती. या घटनेला एक महिना उलटतो नाही तोच नाशिक मर्चंट बँकेच्या संगमनेर शाखेत तब्बल 136 कर्जदारांनी खोटे सोने बँकेत ठेवून कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या फसवणूक प्रकरणात असणारे काही कर्जदार नाशिक मर्चंट बँकेच्या फसवणूक प्रकरणातही आढळून आले आहे. अशाप्रकारे या दोन्ही बँकेतील कर्जदारांनी अजून किती बँकांना चुना लावला आहे. याचा उलगडा त्यांना पकडल्यानंतरच होईल, असे चित्र आहे.

Back to top button