नगर : जिल्हा परिषदेचे आज बजेट; प्रशासक आशिष येरेकर यांचे व्हिजन दिसणार | पुढारी

नगर : जिल्हा परिषदेचे आज बजेट; प्रशासक आशिष येरेकर यांचे व्हिजन दिसणार

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेतील प्रशासकीय राजवटीला वर्ष पूर्ण होत आहे. आज मंगळवारी दुपारी 12 वाजता प्रशासक आशिष येरेकर हे सन 2023-24 चे बजेट सादर करणार आहेत. मात्र, वर्षभरात झेडपीचे स्वतःचे उत्पन्न वाढीसाठी प्रशासकांनी कोणतीही ठोस पावले उचललेली दिसत नाहीत, त्यामुळे शासनाच्या अनुदानावरच हे बजेट दिसणार का? याकडे लक्ष असणार आहे.

गतवर्षी 21 मार्चरोजी पदाधिकार्‍यांचा कार्यकाल संपला. दि. 22 पासून प्रशासकीय राजवट सुरू झाली. आज मंगळवारी येरेकर हे मिनी मंत्रालयाचे बजेट सादर करणार आहेत. यात सुशिक्षित बेरोजगार नोंदणी, साहित्याचे लिलाव, केबल टाकणे, इमारत भाडे, अभिकरण शुल्क, निविदा विक्री, वसाहत भाडे हेच उत्पन्नाचे स्त्रोत असणार आहेत.

त्यामुळे यावर्षीही शासनाकडून मिळणारे मुद्रांक शुल्क व इतर उपकर विचारात घेवूनच बजेटमध्ये तरतुदी केल्या जाणार आहेत. परिणामी, आजचे बजेट हे 45 कोटींचा पल्ला तरी गाठणार का? याकडेही लक्ष आहे.

Back to top button