नेवाशाच्या पश्चिमेला जोरदार पावसाने झोडपले | पुढारी

नेवाशाच्या पश्चिमेला जोरदार पावसाने झोडपले

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्याच्या पश्चिमेला पाचेगाव, कारवाडी व पुनतगाव व सोनईच्या काही भागात शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास विजांचा कडकडाट व वादळी वार्‍यासह अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यात गहू, कांदा, भाजीपाला व हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झाले. या भागात गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये 2022मध्ये पावसाने झालेल्या नुकसानीची मदत अद्यापि शेतकर्‍यांना मिळाली नाही, तोच पुन्हा अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने बांधावर जाऊन नुकसानींचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

2022 च्या शेवटी परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. त्याचे पंचनामे झाले, पण अद्याप शासकीय मदत पोहोचली नाही. त्यातच या नुकसानीने शेतकर्‍याचे कंबरडे मोडले आहे.

                                         – संजय जाधव, शेतकरी, चिंचबन

Back to top button