सोनेवाडी रस्त्यावरून दुचाकी चोरीला | पुढारी

सोनेवाडी रस्त्यावरून दुचाकी चोरीला

नगर : केडगाव परिसरातील सोनेवाडी रस्त्यावरील श्रेया गार्डन येथून दुचाकी चोरीला गेली आहे. नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील रहिवाशी भरत मळू दळवी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. श्रेया गार्डन येथे दळवी आले असता चोरट्याने त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरुन नेली. या घटनेचा तपास हवालदार औटी करीत आहेत.

मोबाईल, सोन्याच्या दागिन्यांची चोरी
मोबाईल आणि घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना शनिवारी (दि.18) नवनागापुरातील चेतना कॉलनीत घडली. याबाबत वैशाली जगन्नाथ थोरात (रा.चेतना कॉलनी, नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैशाली यांचा तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल व कपाटात ठेवलेले 32 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक टिक्कल करीत आहेत.

Back to top button