पारनेर : जुनी पेन्शन योजना लढ्यात तुमच्यासोबत : आमदार लंके | पुढारी

पारनेर : जुनी पेन्शन योजना लढ्यात तुमच्यासोबत : आमदार लंके

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शनच्या लढाईमध्ये तुमच्यासोबत असून, आपल्या प्रश्नासाठी विधानसभेत आवाज उठविणार असल्याची ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी कर्मचार्‍यांना दिले. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचार्‍यांनी काल पंचायत समितीत ठिय्या आंदोलन केले. यावेळी आमदार लंके यांनी पाठिंबा दिला. पेन्शनचे महत्त्व कोरोनात अनेकांना कळले आहे. साठ हजार पगार असणार्‍या कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला नव्या पेन्शन योजनेत दोन हजार अडीच हजारांची तोकडी पेन्शन दिली जात आहे.

हे दुर्दैवी आहे, असे मत जि. प. कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष अभय गट यांनी व्यक्त केले. दत्ताराजे ठुबे, साहेबराव घुले यांनी पेन्शनसंदर्भात विविध गिते सादर केली. नगराध्यक्ष विजय औटी यांनीही समन्वय समितीकडे पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. सोमवारी रक्तदान शिबीर, जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी शिक्षक नेते प्रवीण ठुबे, सूर्यकांत काळे, शिक्षक बँकेचे संचालक कारभारी बाबर, शिक्षक नेते संभाजी औटी, सुदाम दळवी, अमोल साळवे, परिचर संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाचर्णे. आबासाहेब गायकवाड, सोपान गवते, संजय रेपाळे, अरुण पठारे, संतोष खोडदे आदी उपस्थित होते.

त्यांना घालणार बांगड्या!
संपात सहभागी न होता शाळेत, कार्यालयात हजर होतील, अशा कर्मचार्‍यांना महिलांकडून बांगड्या घातल्या जातील, असे समन्वय समितीच्या वतीने सांगण्यात आले.

Back to top button