पुणतांबा : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला तिघांना चावा | पुढारी

पुणतांबा : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला तिघांना चावा

पुणतांबा : पिसाळलेल्या कुत्र्याने पुणतांब्यात शनिवारी धुमाकूळ घातला. तीन जणांना चावा घेतल्यामुळे त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले. पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशतीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले दोन दिवसांपासून नवले गल्ली परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला आहे.

शनिवारी सकाळी वाजता दोन शाळकरी मुलांसह एका महिलेवर हल्ला करून त्यांना जखमी केले. कुत्र्यामुळे यापरिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमींना ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथे इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. एका महिलेच्या दोन्ही हातांवर चावा घेतल्यामुळे तीगंभीर जखमी झाली.मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Back to top button