टाकळीभान : अंगावर वीज पडून शेतकर्यासह गाय ठार

टाकळीभान : विजेच्या कडकडाटात आवकाळीने श्रीरामपूर तालुक्यात जोरदार हजेरी लावली. अंगावर वीज पडून शेतकर्यासह गाय ठार झाली. तालुक्यातील खोकर येथे शनिवारी (दि.18) दुपारी ही दुर्घटना घडली. राजेंद्र मोरे (वय 50) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले मोरे यांना तत्काळ श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले.
मात्र त्यापूर्वीच ते मृत झाल्याचे डॉ. रवींद्र जगधने यांनी घोषित केले. दरम्यान, तालुक्यातील टाकळीभान, खोकर परिसरात गारा व वादळ, वार्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. पावसाने गहू, मका, कांदा पिके भुईसपाट झाली आहेत.