नगर : भिंगार कॅन्टोन्मेंटची निवडणूक स्थगित; इच्छुकांचा झाला हिरमोड | पुढारी

नगर : भिंगार कॅन्टोन्मेंटची निवडणूक स्थगित; इच्छुकांचा झाला हिरमोड

नगर; पुढारी वृत्तसेवा : नगरमधील भिंगार तसेच पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासह देशभरातील 57 बोर्डांच्या निवडणुकांना संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी अचानक स्थगिती दिली आहे. त्यामुळे इच्छुकांची धावपळ उडाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात आले. तेव्हापासून प्रशासक आणि एक नामनिर्देशित सदस्य कामकाज पाहत आहेत. दरम्यान, कॅन्टोन्मेंट बोर्ड कायदा 2006 च्या अधिनियम 41 च्या आधारे 30 एप्रिलपर्यंत मतदान घ्या, अशी सूचना 18 फेब्रुवारीला प्रसिद्ध केलेल्या राजपत्राद्वारे दिली होती. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया राबविली जात होती.

गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारी अर्जांचे वाटपही सुरू होते, तर दुसरीकडे निवडणूक कार्यक्रमानुसार मतदार यादी अंतिम केली जात होती. संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार शुक्रवारपासून (17 मार्च) निवडणूकविषयीचे सर्व कामकाज थांबविण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार संपूर्ण कामकाज थांबविण्यात आले आहे, अशी माहिती पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब—त पाल यांनी दिली.

Back to top button