नेवासा : जागा नावावर करण्यासाठी महिलेस मारण्याची धमकी | पुढारी

नेवासा : जागा नावावर करण्यासाठी महिलेस मारण्याची धमकी

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा फाटा येथील वृद्ध महिलेला निम्म्या रात्री घरी येऊन तिघांनी शिवीगाळ करत, जागा नावावर करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शोभा हिंमतराव मुरकुटे (वय 60) ही महिला तिच्या राहत्या घरी एकटीच राहते. तिच्या जागेच्या समोर बांधलेले गाळे भाड्याने देऊन ती उदरनिर्वाह करते.

बुधवारी (दि.15) रात्री अडीचच्या सुमारास ही महिला घरात एकटीच झोपलेली असताना, तिच्या घरासमोर येत तिघांनी आरडाओरडा सुरू केला. ही महिला बाहेर येताच सुनील वसंत कोळेकर, टिल्लू दत्तू निपुंगे व खंडू दादा कराडे (सर्व रा.मुकिंदपूर ता.नेवासा) यांनी तिला जागा नावावर करून देण्यासाठी शिवीगाळ केली. महिलेने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. महिलेच्या फिर्यादीवरू या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button