कर्जत तालुका सोडला वार्‍यावर; संपामुळे महसूल विभागाचे अवघे चार कर्मचारी हजर | पुढारी

कर्जत तालुका सोडला वार्‍यावर; संपामुळे महसूल विभागाचे अवघे चार कर्मचारी हजर

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहे. या तालुक्यातील महसूल विभागाच्या 59 कर्मचार्‍यांपैकी 53 कर्मचारी सहभागी झाले आहेत. दोन कर्मचारी आजारी असून, अवघ्या चार कर्मचार्‍यांवर तालुक्याचे कामकाज सुरू आहे.

या आंदोलनाची झळ जनतेला बसत आहे. जिल्हाधिकारी यांनी संपामध्ये कर्मचार्‍यांनी सहभागी होऊ नये, असा आदेश काढलेला आहे. असे असताना इतर विभागांच्या तुलनेत महसूल विभागाचे सर्वात जास्त कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. कर्मचार्‍यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांचे हाल होत आहेत.

महसूल विभागाशी निगडित सर्व कामे प्रलंबित राहत आहेत.तत्काळ तालुक्यातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी युवा सेनेचे तालुकाप्रमुख सोमनाथ शिंदे यांनी केली आहे.

Back to top button