नगर : जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा विलंबाने | पुढारी

नगर : जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा विलंबाने

नगर; पुढारी वृत्तसेवा : शहर पाणीपुरवठा योजनेवरील मुख्य जलवाहिनी दुरुस्तीसाठी आज (दि. 18) शटडाऊन घेण्यात येणार असल्याने शहराच्या मध्य भागासह उपनगरांमध्ये एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे महापालिकेने कळविले आहे. मुळानगर ते विळद पंपिंग स्टेशन दरम्यान कार्यरत नवीन मुख्य जलवाहिनीला आठ दिवसांपासून चार ठिकाणी गळती लागली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी शनिवारी (दि. 18) शहर पाणीपुरवठा योजनेवर शटडाऊन घेण्यात येणार आहे.

मुळानगर येथून पाणी उपसा होणार नसल्याने शहरातील टाक्या भरता येणार नाहीत. परिणामी शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात सकाळी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. या भागाला रविवारी नियमित पाणीपुरवठा होणार आहे.

रविवारी (दि. 19) रोटेशननुसार पाणी वाटपाच्या मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको, स्टेशन रोड, विनायकनगर परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. या भागात सोमवारी (दि. 20) पाणीपुरवठा होईल.

सोमवारी (दि. 20) सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी भागात पाणीपुरवठा होणार नसून तो मंगळवारी (दि. 21) रोजी करण्यात येईल. शहरात एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Back to top button