नगर : आंदोलनाचा 3 रा दिवस ! आदेश पत्राविरोधात ‘बोंबाबोंब’

नगर; पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मंगळवारपासून (दि.14) सुरू आहे. गुरुवारी आंदोलनाच्या तिसर्या दिवशीही शिक्षक, शासकीय, निमशासकीय कर्मचार्यांनी आंदोलन सुरू ठेवले. यामुळे शाळा, माहाविद्यालये बंदच राहिली आहेत. परंतु, सर्व सामन्यांसाठी महत्त्वाची असणारी कार्यालये ओस पडली आहेत. याचा त्यांच्या जीवनमानावरही परिणाम झाल्याने दिसून आले. जिल्ह्यातील पारनेर, पाथर्डी, कर्जतसह अन्य तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे.
राज्य सरकारने गठीत केलेल्या समिती विरोधात महिला आक्रमक
पाथर्डी पंचायत समिती समोर जुन्या पेन्शन संदर्भात राज्य सरकारने गठीत केलेल्या समितीच्या आदेश पत्राची होळी करण्यात आली. महिला कर्मचार्यंनी आक्रमक होत याविरोधात ठोकली बोंबाबोंब. ‘एकच मिशन.. जुनी पेन्शन..,’ असा नारा त्यांनी दिला.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षकासह विविध शासकीय राज्य कर्मचार्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन मंगळवारपासून (दि.14) सुरू आहे. गुरुवारी आंदोलनाच्या तिसर्या दिवशीही कर्मचार्यांनी आंदोलन सुरू होते. सरकारला जाग यावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनाचे मार्ग अवलंबत आंदोलनात सहभागी कर्मचार्यांनी तीन दिवसापासून जुन्या पेन्शनची मागणी लावून धरली आहे.
‘आमच्या हक्काची पेन्शन’ ही मिळालीच पाहिजे, सरकारी नोकरीत काम करताना पुढील आर्थिक भविष्याचा सरकारकडे ठोस कोणता निर्णय नाही, सध्या लागू केलेली नवीन पेन्शन योजना त्याचा कुठेही ताळमेळ लागत नाही, त्यामुळे शासकीय कर्मचार्यांचे जीवन आर्थिकदृष्ट्या अंधारमय झाले आहे. यातून बाहेर काढत कर्मचार्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने करावे, अशी मागणी राज्य कर्मचार्यांनी केली.
या आंदोलन प्रसंगी दिलिप बोरूडे, अर्जुन शिरसाट, परिमल बाबर, राजेंद्र जायभाय, नीलेश वराडे, नीलेश गोरे, सचिन शेरकर, कल्याण लवांडे, ज्ञानेश्वर शिरसाट, संदीप भागवत, रवींद्र फुंदे, सुनील शिदे, गहिनीनाथ शिरसाट, श्रीकृष्ण खेडकर, रवि देशमुख, एकनाथ आंधळे, सुवर्णा राठोड, सुरेखा बडे, प्रभोधिनी देशमुख, रेखा वरोडे, गीतांजली खलेकर, मंजुश्री लाटणे, अश्विनी भागवत, ज्योती आधाट, चेतना लवांडे, सुरेखा आंबेटकर, आनिता शिरसाट, सीमा आंधळे, वनिता पालवे, मिनिनाथ देवकर, आश्रुबा चव्हाण, भारत शिरसाट आदी उपस्थित होते.