वाळकी : भरधाव कार ट्रकवर धडकून दोन ठार | पुढारी

वाळकी : भरधाव कार ट्रकवर धडकून दोन ठार

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : वळणावर भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून ट्रकवर धडकून झालेल्या अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार झाले. मंगळवारी (दि. 14) रात्री नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात हा अपघात झाला. नारायण खंडू पडघन (वय 26, रा. पिंपळगाव रोठा, ता. पारनेर) व आजिनाथ रमेश साळुंके (वय21, रा. धानोरा, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.

चास शिवारात चालक नारायण पडघन याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्ता दुभाजकाला धडकून उलटली आणि रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला समोरून येणार्‍या ट्रकवर धडकली. त्यात दोघेही जागीच ठार झाले. ट्रकचालक रामचंद्र भाऊराव पालवे (रा. पालवेवाडी, ता. पाथर्डी) यांनी गुरुवारी (दि. 16) नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मृत कारचालक पडघन यांच्या विरोधात अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button