नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात एन्फ्लुएंझाचा रुग्ण आढळल्यानंतर कोरोना बाधितांचा आकडाही दररोज वाढता आहे. कालच्या अहवालाता 13 जण कोरोना बाधित आले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता 38 झाली आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि लसीकरणाबाबत आवाहन केले आहे.
जिल्ह्यात मंगळवार पाच, बुधवारी आठ कोरोना बाधित आढळले होते. त्यामुळे ही आकडेवारी नगरकरांची चिंता वाढणारी दिसत आहे.
आरोग्य विभागाने कोरोना चाचण्याही वाढवण्यावर भर दिला आहे. काल गुरूवारी दिवसभरात 174 चाचण्या झाल्या. यामध्ये 13 बाधित सापडल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून समजली. यामध्ये राहाता तालुक्यात 10, मनपा क्षेत्र 1, श्रीगोंदा 1, अन्य हॉस्पिटल 1, अशाप्रकारे कोरोना बाधित अहवाल आले आहेत. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांचा दररोजच्या कोरोना चाचण्या आणि त्यांच्या अहवालावर वॉच आहे. तसेच प्रशासनाला आणि नागरिकांनाही ते आवश्यक त्या सूचना करत आहेत.