राहुरी : बांधावर ट्रॅक्टर घातल्याने एकास केली मारहाण | पुढारी

राहुरी : बांधावर ट्रॅक्टर घातल्याने एकास केली मारहाण

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : सामाईक बांधावर ट्रॅक्टरचे चाक घाल्याच्या कारणावरून दत्तात्रय जाधव यांना कुदळ व लाथ्थांनी मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालूक्यातील कोल्हार खुर्द येथे घडली. दत्तात्रय भाउसाहेब जाधव (रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बबन बाबुराव जाधव, अमोल रावसाहेब जाधव, सतिष बबन जाधव, पोपट प्रभाकर जाधव (सर्व रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी) यांच्या विरुद्ध शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधव यांची कोल्हार खुर्द गावचे शिवारात शेती असुन त्यांच्या शेजारी बबन बाबुराव जाधव यांची शेती आहे. दिनांक 12 मार्च दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास दत्तात्रेय जाधव हे त्यांच्या शेतातील सामाईक बांदावर होते. त्यावेळी तेथे आरोपी आले आणि दत्तात्रय जाधव यांना म्हणाले की, तुम्ही सामाईक बांदावरुन ट्रॅक्टरचे चाक का घातले. असे म्हणत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांचे वडील भाऊसाहेब काशिनाथ जाधव व आई गीताबाई भाऊसाहेब जाधव हे सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण केली.

Back to top button