एकरुखे : धारदार चाकूने पत्नीचा निर्घृण खून | पुढारी

एकरुखे : धारदार चाकूने पत्नीचा निर्घृण खून

एकरुखे; पुढारी वृत्तसेवा : काही महिन्यापूर्वीच प्रेमविवाह केलेल्या पतीने 19 वर्षीय पत्नीच्या पोटात चाकू खुपसून खून केल्याची घटना राहात्यातील साकुरी गावात घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेनंतर पतीने वीश प्राशन केले होते. पोलिसांनी पतीस लोणी येथे रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी मृत विवाहितेचे वडील सुखदेव बाळासाहेब नागरे (वय 45 वर्षे, रा. साकुरी, डांगे वस्ती) यांनी राहाता पोलिसात फिर्याद दिली.

मुलगी सविता व पिंपळस येथील सनी ऊर्फ सुनील शिवाजी ससाणे यांचा आंतरजातीय विवाह वर्षापूर्वी लावून दिला होता. मुलगी व जावई साकुरी शिवारात मोलमजुरी करून उपजिविका करीत होते, परंतु लग्नानंतर तीन महिन्यात सवितास पती सनी मारहाण करीत असे. ही बाब तिने वडील सुखदेव नागरे यांना सांगितली होती.

नागरे यांनी मारहाण, दमदाटी करू नको, असे सनी यास सांगितले, मात्र त्याच्या वर्तनात बदल झाला नाही. (दि. 8) मार्च रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास सर्वजण घराशेजारी वरात पाहण्यास गेले होते. सविता व सनी घराबाहेर दिसले नाही. म्हणून कोपीकडे बघण्यास दुसर्‍या मुलीस पाठवले असता, ‘सविता मृत अवस्थेत असून, सुनील दाजीच्या हातात चाकू दिसला, असे वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button