नगर : मतदारसंघासाठी 84.40 कोटींचा निधी : आमदार मोनिका राजळे | पुढारी

नगर : मतदारसंघासाठी 84.40 कोटींचा निधी : आमदार मोनिका राजळे

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील रस्ते, पुलासह इतर विकासकामांसाठी अर्थसंकल्प मार्च 2023 अंतर्गत 84 कोटी 40 लाख रूपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. पाथर्डी येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकामासाठी 9 कोटी 15 लाखांचा निधी मिळाला आहे. त्याचबरोबर शेवगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी 37 कोटी 75 लाख रुपये, तर पाथर्डी तालुक्यातील रस्ते व पुलाच्या कामांसाठी 37 कोटी 50 लाख रूपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे.

आमदार राजळे यांच्या मागणीप्रमाणे अर्थसंकल्पात शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी कांबी रस्ता 1 कोटी, बालमटाकळी ते बाडगव्हाण रस्ता 50 लाख, शेवगाव रा.मा. 21 ते तळणी देवी रस्ता 1 कोटी, रा.मा.50 ठाकूर निमगाव फाटा ते ठाकूर निमगाव रस्ता 80 लाख, प्र.जि.मा 38 ते सालवडगाव- मुर्शदपूर रस्ता 1 कोटी 50 लाख, बोधेगाव ते चेडेचांदगाव रस्ता ग्रा.मा.92 साठी 1 कोटी, लाडजळगाव ते शेलार वस्ती रस्ता ग्रा.मा 83 साठी 50 लाख, शिंगोरी ते थाटे रस्ता 1 कोटी 25 लाख, बोधेगाव ते घुमरेवस्ती रस्ता 50 लाख, रा.मा.50 दत्तपाटी ते देवटाकळी रस्ता 1 कोटी, देवटाकळी-वडुले रस्ता 50 लाख, शहरटाकळी येथील कदमवस्ती ते डोळे वस्ती उर्वरित रस्ता 50 लाख, राणेगाव-अधोडी रस्ता 60 लाख, भगुर-आव्हाणे रस्ता 1 कोटी, वाघोली ते कामत शिंगवे रस्ता 1 कोटी 25 लाख, शेवगाव-खुंटेफळ-ताजनापूर रस्ता 2 कोटी 50 लाख, तिसगाव- शेवगाव- पैठण रस्ता 2 कोटी 50 लाख, भातकुडगाव-ढोरजळगाव रस्ता 2 कोटी 55 लाख, शेवगाव- ताजनापूर-दहिफळ रस्ता, दहिफळ गावात काँक्रिटीकरण व गटार बांधकाम 2 कोटी 50 लाख, शेवगाव-वरूर रस्ता प्रजिमा 164 साठी 2 कोटी 50 लाख, आव्हाणे मळेगाव-भातकुडगाव रस्ता 2 कोटी, शेवगाव-आखेगाव रस्ता 2 कोटी, प्रभुवाडगाव खामपिप्री-मुंगी रस्ता (आपत्कालीन मार्ग) 2 कोटी 50 लाख, खानापूर-रावतळे-राक्षी ठाकुर निमगाव रस्ता 2 कोटी, ढोरजळगाव-आव्हाणे अमरापूर रस्ता 2 कोटी 50 लाख, खुंटेफळ ते दारकुंडे वस्ती रस्ता ग्रा.मा. 151 साठी 40 लाख, बोधेगाव ते एकबुर्जी पहिलवान वस्ती रस्ता 65 लाख, बोडखे ते ताजनापूर रस्ता ग्रा.मा.12 रस्ता 30 लाख रूपये या कामांचा समावेश आहे.

पाथर्डी तालुक्यातील मौजे सुसरे-पा. पिंपळगाव रस्ता येथील पांढरे वस्ती येथे जोड रस्त्यासह पुलाचे बांधकाम करणे 4 कोटी, मौजे सुसरे-पा. पिंपळगाव रस्ता येथील कंठाळी वस्ती येथे जोड रस्त्यासह पुलाचे बांधकाम करणे 3 कोटी, कोरडगाव-बोधेगाव रस्त्यावर पुलाचे बांधकाम व रस्त्याची सुधारणा करणे 2 कोटी, सोनोशी-तोंडोळी रस्त्यावर पूल बांधणे 2 कोटी 50 लाख, मढी-पाथर्डी रस्ता 2 कोटी, निवडुंगे-मढी रस्ता 80 लाख, रामा-54 खेर्डे फाटा ते खेर्डे सांगवी ते पागोरी पिंपळगाव रस्ता 1 कोटी, मोहोजदेवढे ते बहिरवाडी रस्ता ग्रा.मा.17 साठी 60 लाख, रामा-61 तुळजवाडी ते नांदूर निंबदैत्य रस्ता 1 कोटी 50 लाख, चिंचपूर पांगूळ ते वडगाव वाघेश्वरी जोड रस्ता 40 लाख, रा.मा.61 ते माळीबाभुळगाव हत्राळ ते पाडळी रस्ता 75 लाख, मोहरी भांडेवाडी ते मोहटादेवी रस्ता 80 लाख, प्र.जि.मा. 47 ते मानेवाडी रस्ता 90 लाख, चेकेवाडी-धनगरवाडी-हरीचा तांडा ग्रा. रस्त्याची छोट्या पुलासह सुधारणा करणे 80 लाख, माणिकदौंडी लांडकवाडी रस्ता 1 कोटी, साकेगाव ते सातपुते वस्ती रस्ता 60 लाख, हत्राळ-डांगेवाडी इ.जि.मा. 254 छोटा पुल व रस्त्याची सुधारणा करणे 50 लाख, इ.जि.मा. 191 (कोरडगांव) ते घुलेवस्ती ते पिंपळगव्हाण रस्ता करणे 1 कोटी 10 लाख याप्रमाणे कामे अर्थसंकल्प मार्च 2023 अंतर्गत समाविष्ट आहेत.

ही कामे मंजूर करून निधी उपलब्ध केल्याबद्दल आमदार राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांचे आभार मानले.

राज्यात सत्तांतरानंतर विकासाला चालना
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मतदारसंघातील प्रमुख रस्ते व इतर विकासकामांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने सर्व समावेशक व सर्व घटकांना प्रगतिपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाने शेवगाव-पाथडी मतदार संघासाठी भरभरून निधी दिला आहे. पुढील काळातही या विकासाभिमुख शासनाच्या काळात मतदारसंघातील जास्तीतजास्त विकास कामे करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे आमदार राजळे यांनी सांगितले.

Back to top button