अकोले : ट्रेलरच्या धडकेमध्ये दुचाकीस्वार जागीच ठार | पुढारी

अकोले : ट्रेलरच्या धडकेमध्ये दुचाकीस्वार जागीच ठार

अकोले; पुढारी वृत्तसेवा : रस्त्याचे काम करणार्‍या ट्रेलरच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार झाला. शिवकुमार रामकिशोर चौहान (वय 18 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. अनेकदा रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल पुढारी, नेते, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थांनी आंदोलने, मोर्चाचा अवलंब केला, मात्र गलथान कारभारामुळे पुन्हा अकोले शहरात शिवकुमार रामकिशोर चौहान या पल्सर (क्र. एम एच 17 ए वाय 4563) वरुन अकोलेकडुन राजुरकडे येत असताना भिंगारे यांच्या दुकानासमोर आल्यावर पाठीमागुन येणार्‍या (क्र. एम एच 12 के पी 6221) ट्रेलर चालकाने भरधाव वेगात धडक दिल्याने डोक्यास मार लागून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ट्रेलर चालकाविरोधात अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

हलगर्जीपणामुळे या रस्त्यावर अपघातात काही महिन्यात तब्बल सहा जणांना जीव गमवावा लागला. कोल्हार- घोटी राज्य मार्गावर संगमनेर, अकोले, राजूर, बारी या रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. अकोले शहरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची रांग लागते. अकोले नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग व आरटीओ प्रशासनाकडून सुचना फलक अथवा वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. या गलथान कारभाराचा नागरिकांना त्रास होत आहे.

Back to top button