संगमनेर : विद्यार्थिनीचा पाठलाग करणार्यास कारावास

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : महाविद्यायीन शिक्षण घेणार्या एका अल्पवयीन विद्यर्थिनीचा पाठलाग करीत तिची छेड काढत तिचा विनयभंग करणार्या एका मजनूला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सहा महिन्यांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
7 वर्षांपूर्वी मुदस्सर जाफर शेख हा शहरातील एक अल्पवयीन विद्यार्थीनी दररोज महाविद्यालयात जात असताना पाठलाग करु लागला. तिने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. त्याला समजून सांगून कुठलाही फरक पडला नाही.
ती अल्पवयीन विद्यार्थीनी शिकवणी संपवून आपल्या मोपेड गाडीने घराकडे जात असतांना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुदस्सर शेख याने दुचाकी वरुन येत तिच्या वाहनाला रोखून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य तिच्याशी केले. याबाबत पीडित अल्पवयीन विद्यार्थिनींनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुदस्सर जाफर शेख याच्या विरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची अतिरीक्त जिल्हा सत्रन्यालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्या समोर सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्यावतीने तीन साक्षीदारांचे जवाब नोंदविले. सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी जोरदार युक्तिवाद केलात्यानुसार न्यायालयाने मुदस्सर जाफर शेख याला विनयभंग व पोक्सोतील तरतूदींच्या आधारे सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा व 20 हजार रुपये दंड ठोठावला.