नगर : वीज पडून पवनचक्की खाक ; साकत परिसरातील घटना | पुढारी

नगर : वीज पडून पवनचक्की खाक ; साकत परिसरातील घटना

साकत : साकत, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, कडभनवाडी परिसरात मंगळवारी दुपारी एक वाजता विजेच्या कडकडट व सुसाट वार्‍यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावासामुळे शेतकर्‍यांची धावपळ उडाली. काही पिकाचे नुकसान झाले. पिंपळवाडी परिसरातील पवनऊर्जा निर्माण करणार्‍या कंपनीच्या पवनचक्कीवर दुपारी दोन वाजता वीज पडून आग लागली. यामध्ये पाते जळून लाखोंचे नुकसान झाले. यात जीवत हानी झाली नाही. आज दुपारी विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस झाला. पिंपळवाडी येथे पवनचक्कीवर वीज पडल्याने आग लागली. मोठ्या प्रमाणात परिसरात धूर झाला होता. पवनचक्कीचे पाते खाली पडले, यावेळी जाळ सुरूच होता. काल सायंकाळपासून वादळी वार्‍यासह काही भागात पावसाला सुरूवात झाली.

दुपारी साकत, पिंपळवाडी परिसरात वादळी वार्‍यासह वीजेचा गडगडाट सुरू झाला. दुपारी दोनच्या आसपास पिंपळवाडी परिसरात टेकाळे वस्ती जवळ शिवदास गंगाराम नेमाने यांच्या शेतात असलेल्या पवनचक्कीवर वीज कोसळली. साकत, पिंपळवाडी परिसरात काय पेटले? असे लोकांना वाटले. रात्र झाली तरी जाळ चालू होता. इतरत्र आग लागू नये, अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पवऊर्जावर काम करणारे कामगार तळ ठोकून होते

Back to top button