नगर : 4478 हेक्टरला अवकाळीचा फटका | पुढारी

नगर : 4478 हेक्टरला अवकाळीचा फटका

नगर : पुढारी वृत्तसेवा : तीन दिवसांपासून आवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वार्‍याने जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. आवकाळीने 151 गावातील 8 हजार 791 शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. अनेक ठिकाणी मका, गहू पिके भुईसपाट झाली. जिल्ह्यात रबी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. जिरायती पट्टा वगळता अन्य भागात गहू, हरभरा, कांदा पिका अशी पिके शेतात मोठ्या प्रमाणात उभी आहेत.

गेल्या 5 ते 7 मार्च असे तीन वादळी वारा, गारपीठ व जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यात मका, गहू, हरभरा, उन्हाळी बाजरी आणि टरबूज, आंबा, संत्रा अशा फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. तर, टोमॅटो, कांदा, कोबी अशा भाजीपाला पिकांसह झेंडूच्या फुलांचेही नुकसान झाले. दरम्यान, कांद्याला अगोदरच भाव नाही आणि त्यात आता पुन्हा पावसाने कांदा झोडपून काढला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

राहुरी, नेवाशात सर्वाधिक नुकसान
आवकाळी पावसाने बागायती पट्टा असलेल्या राहुरी व नेवाशात सर्वाधिक नुकसान झाले. राहुरीत 59 व नेवाशात 50 गावात आवकळीने फेरा मारला. त्यात राहुरीतील 2258 हेक्टर तर, नेवाशातील 885 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

तालुकानिहाय नुकसान (हेक्टर)
33 टक्केपेक्षा कमी
नगर 11, राहुरी 1917, नेवासा 110,
संगमनेर 80, अकोले 174, कोपरगाव 12
33 टक्क्यांपेक्षा जास्त
नगर 39, राहुरी 341, नेवासा 775, शेवगाव 253, अकोले 700, कोपरगाव 34,
राहाता 30.

तालुकानिहाय बाधीत गावे
नगर 5, राहुरी 59, नेवासा 50, शेवगाव 3, संगमनेर 5, अकोले 15, कोपरगाव 9, राहाता 4, कर्जत 1

तालुकानिहाय बाधीत शेतकरी
पारनेर 74, कर्जत 1, राहुरी 3740, नेवासा 2450, शेवगाव 405, संगमनेर 135, अकोले 1901, कोपरगाव 55, राहाता 30

Back to top button